‘लव्ह की अरेंज मॅरेज’मध्ये अवनीत

‘लव्ह की अरेंज मॅरेज’मध्ये अवनीत

झी5 वर झळकणार चित्रपट
अभिनेत्री अवनीत कौरने स्वत:च्या आगामी चित्रपटाची घोषणा करत त्याचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव लव्ह की अरेंज मॅरेज असून यात तिच्यासोबत सनी सिंह दिसून येणार आहे. हा चित्रपट लवकरच झी5 वर प्रदर्शित होणार आहे.
‘लव्ह की अरेंज मॅरेज’मध्ये अवनीत आणि सनी सिंहसोबत अन्नू कपूर, सुप्रिया पाठक, राजपाल यादव, सुधीर पांडे आणि पारितोष त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन इशरत खान यांनी केले आहे. विनोद भानुशाली आणि  राज शांडिल्य हे याचे निर्माते आहेत.
चित्रपटात छोट्या शहराची कहाणी दर्शविण्यात येणार असून यात एक युवा जोडेपे लव (सनी सिंह) आणि इशिका (अवनीत) यांची प्रेमकहाणी असेल. अवनीत कौर अलिकडेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसून आली होती. यात तिने स्वत:च्या आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपटाची घोषणा केली होती. अवनीत ही अभिनेत्री असण्यासोबत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे.
अवनीतने मागील वर्षी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच्या ‘टीकू वेड्स शेरू’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये मुख्य नायिका म्हणून पदार्पण केले होते. यापूर्वी तिने अनेक मालिकांमध्ये काम केले होते.