अरविंद केजरीवालांना 2 जूनला कारागृहात शरण जावे लागणारच

जामीन वाढवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली वृत्तसंस्था /नवी दिल्ली दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला. सीएम केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीसाठी अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवण्याची मागणी करणारी याचिका स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. साहजिकच अरविंद केजरीवाल यांना आता 2 जूनला शरण जावे लागणार आहे. […]

अरविंद केजरीवालांना 2 जूनला कारागृहात शरण जावे लागणारच

जामीन वाढवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा आरोप असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला. सीएम केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीसाठी अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवण्याची मागणी करणारी याचिका स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. साहजिकच अरविंद केजरीवाल यांना आता 2 जूनला शरण जावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. मुख्यमंत्री केजरीवाल 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर आहेत. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात मनी लाँड्रिंग आरोपाखाली त्यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना 10 मे ते 1 जून या कालावधीत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला जामीन कालावधी वाढवून मिळण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.