Leopard News : शेवटी बिबट्या जेरबंद केला!
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावात १५ दिवसापूर्वी लावलेल्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले, अशी माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. रविवारी (दि. १९) पहाटे १ वाजेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या हा तीन वर्षाचा नर असून तो जास्त आक्रमक दिसून येत आहे.
उप वनसंरक्षक अमोल सातपुते, वक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुवर्णा खुटेकर, वनरक्षक अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ, वारूळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी बिबट्याला गाडीमध्ये टाकून माणिकडोह बिबट निवारण केंद्र या ठिकाणी नेण्यात आले आहे.
हेही वाचा
Maratha Resevration : छगन भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध व्यक्त
Sugarcane Andolan : कोल्हापुरात ऊसदर आंदोलन तीव्र; स्वाभिमानीचा चक्काजाम
Dhangar Reservation : ओबीसी नेत्यांची बेताल वक्तव्ये; पुरंदर तालुका अस्वस्थ
The post Leopard News : शेवटी बिबट्या जेरबंद केला! appeared first on पुढारी.
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव तर्फे नारायणगाव या गावात १५ दिवसापूर्वी लावलेल्या वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले, अशी माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली. रविवारी (दि. १९) पहाटे १ वाजेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला. पकडलेला बिबट्या हा तीन वर्षाचा नर असून तो जास्त आक्रमक दिसून येत आहे. उप वनसंरक्षक अमोल …
The post Leopard News : शेवटी बिबट्या जेरबंद केला! appeared first on पुढारी.