Crime News : व्यापार्‍याची फसवणूक; दाम्पत्यावर गुन्हा

चाकण : पुढारी वृत्तसेवा : बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचा व्यवहार करीत खोटे बक्षीसपत्र बनवून एका व्यापाऱ्याची महिला व्यावसायिकाने तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 जून 2019 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत खराबवाडी (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी मनोहर मोनिराम नायडू (वय 63, रा. भोसरी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून … The post Crime News : व्यापार्‍याची फसवणूक; दाम्पत्यावर गुन्हा appeared first on पुढारी.

Crime News : व्यापार्‍याची फसवणूक; दाम्पत्यावर गुन्हा

चाकण : पुढारी वृत्तसेवा : बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचा व्यवहार करीत खोटे बक्षीसपत्र बनवून एका व्यापाऱ्याची महिला व्यावसायिकाने तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 जून 2019 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत खराबवाडी (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी मनोहर मोनिराम नायडू (वय 63, रा. भोसरी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अमृत शाम केसवड (वय 39, रा. खराबवाडी) व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महाळुंगे पोलिसांत देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जमीन मिळकत गट नंबर 273, गट नंबर 277 व गट नंबर 278 मध्ये आरसीसी इमारत येथील 7583 चौरस मीटर व 75.83 चौरस मीटर एकूण 522 चौरस फूट जमिनीचा संबंधितांनी फिर्यादी नायडू यांच्याशी व्यवहार ठरवला. संबंधित जमीन ही 92 लाख रुपयांची असून, ती 82 लाख रुपयाला देत असल्याचे सांगत यासाठी फिर्यादी यांच्याकडून 9 लाख रुपये घेण्यात आले.
मात्र, संबंधित जमीन ही बँकेकडे तारण असल्याची कोणतीही माहिती संबंधित दाम्पत्याने फिर्यादी यांना दिली नाही. तसेच विक्रीचा व्यवहार सुरू असताना आरोपीने पत्नीच्या संमतीने आपल्या मुलाच्या नावे त्या जमिनीचे बनावट बक्षीसपत्र बनवून घेतले. आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात येताच फिर्यादी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा
Pune News : बंधार्‍यावरून प्रवास ठरतोय धोकादायक
Maratha Resevration : छगन भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध व्यक्त
Dhangar Reservation : ओबीसी नेत्यांची बेताल वक्तव्ये; पुरंदर तालुका अस्वस्थ
The post Crime News : व्यापार्‍याची फसवणूक; दाम्पत्यावर गुन्हा appeared first on पुढारी.

चाकण : पुढारी वृत्तसेवा : बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचा व्यवहार करीत खोटे बक्षीसपत्र बनवून एका व्यापाऱ्याची महिला व्यावसायिकाने तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 15 जून 2019 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत खराबवाडी (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी मनोहर मोनिराम नायडू (वय 63, रा. भोसरी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून …

The post Crime News : व्यापार्‍याची फसवणूक; दाम्पत्यावर गुन्हा appeared first on पुढारी.

Go to Source