Maratha Resevration : छगन भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध व्यक्त
कुसेगाव : पुढारी वृत्तसेवा: कुसेगाव (ता. दौंड) येथे छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करून अपशब्द वापल्याने आक्रमण झालेल्या मराठा बांधवांनी छगन भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून भुजबळ यांच्या विरोधात तीव्र शब्दात घोषणा देत पुतळा जाळण्यात आला.
रविवारी (दि. १९) सकाळी १० वाजता मराठा बांधव कुसेगाव येथील चौकात एकत्र येत भुजबळ यांच्या विरोधात घोषणाबाजी करून पुतळा जाळण्यास आला. यावेळी मराठा समाजातील तरुणांचा यामध्ये सहभाग होता. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील प्रयत्न करीत असताना छगन भुजबळ यांनी त्यांच्याबदल केलेल्या टिका व वापरलेले अपशब्द यामुळे मराठा बांधव आक्रमक झाला आहे.
छगन भुजबळ यांचा निषेध करण्यासाठी मराठा बांधव कुसेगाव चौकात एकत्र आला होता. छगन भुजबळ त्यांच्यावरोधी तीव्र शब्दात घोषणा देत मराठा समाज आक्रमक झाला होता. यावेळी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, भुजबळ चोर आहे, अश्या घोषणा मराठा बांधवांकडून देण्यात आल्या आहे.
हेही वाचा
कोल्हापूरात ऊसदर आंदोलन तीव्र; स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन
Dhangar Reservation : ओबीसी नेत्यांची बेताल वक्तव्ये; पुरंदर तालुका अस्वस्थ
Pune News : सुट्या मिळत नसल्याने पोलिस दलात नाराजी
The post Maratha Resevration : छगन भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध व्यक्त appeared first on पुढारी.
कुसेगाव : पुढारी वृत्तसेवा: कुसेगाव (ता. दौंड) येथे छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करून अपशब्द वापल्याने आक्रमण झालेल्या मराठा बांधवांनी छगन भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून भुजबळ यांच्या विरोधात तीव्र शब्दात घोषणा देत पुतळा जाळण्यात आला. रविवारी (दि. १९) सकाळी १० वाजता मराठा बांधव कुसेगाव येथील …
The post Maratha Resevration : छगन भुजबळांचा प्रतिकात्मक पुतळा जाळुन निषेध व्यक्त appeared first on पुढारी.