कंटाळा आलाय?
कंटाळा आलाय, बोअर होतंय, काय करावं ते सुचतंच नाही, असं आपलं बरेचदा होतं; पण काय करावं ते सुचत नाही तेव्हा या टिप्स ट्राय करून बघा.
कलागुणांना द्या वाव ः प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त इच्छा पूर्ण होतातच असे नाही. पेंटर, डान्सर, सिंगर, गार्डनिंग असो की स्वयंपाक किंवा आणखी काहीतरी; आवडत्या गुणाला आपल्या व्यस्त प्रोफेशनमुळे वेळ देता येत नाही. काही कारणास्तव हे सर्व शौक बाजूला ठेवणे गरजेचे असते. मात्र, हे शौक आपल्या जीवनातील आनंद तुम्ही वाढवू शकतात.
नोकरी बदला ः नोकरीच्या ठिकाणी मन लागत नसेल तर ताबडतोब नोकरी बदलण्याचा विचार करायला हवा. काही महिला अशाही असू शकतात की, एकच ठिकाणी काम करणे त्यांना कंटाळवाणे वाटत असते. त्यामुळे तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहू शकत नाही. काही वेळेस खोटे बोलावे लागते. कारण काम करण्याच्या ठिकाणी आज जायचे नाही, यासाठी कोणते ना कोणते कारण तुम्ही शोधत असता; पण ओझं म्हणून काम तुम्ही करू नका. या पद्धतीची कारणे तुम्ही शोधत असाल तर ताबडतोब नोकरी सोडण्याचा आणि नवीन जागी उत्साहाने आणि नव्या जोमाने कामाला लागा.
शॉपिंग करा ः मन प्रसन्न ठेवण्यासाठी शॉपिंग हे चांगले. जॉब करणार्या महिलांनी घरी जाताना थोडे मार्केटमध्ये थांबून फळे, भाजी वगैरे घ्यावी. त्यामुळे तुमचे टेन्शन काही प्रमाणात का असेना कमी होईल. कारण भाव करण्याच्या नादात आपण आपल्या टेन्शनच्या विचारांपासून दूर जातो. त्यामुळे मन हलके, शॉपिंगदेखील आपल्याला तणावमुक्तीस मोठी मदत करते.
मुलांबरोबर खेळा ः तुमच्या घरी मुलं नसतील तर तुम्ही जवळील एखाद्या पार्कमध्ये रोज संध्याकाळचा वेळ घालवावा. कारण उद्यानामध्ये प्रसन्न वातावरणात अनेक मुले खेळायला येत असतात. त्यांचे बोलणे, भांडण करणे आणि हसणे हे पाहूनदेखील काही वेळेस आपल्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारतो. त्यामुळे दिवसभराचा थकवा पटकन निघून जातो.
पाळीव प्राणी बाळगा ः आपण आपल्या घरी एखादा डॉगी किंवा मांजराचे पिलूदेखील पाळू शकता. त्यांच्याशी बोलण्याने आपल्या मनावरचा ताण बर्याच वेळा हलका होतो. प्राणी पाळणे ज्यांना कठीण वाटत असेल त्यांनी रंगीबेरंगी मासे घरात पाळावेत. त्यांच्याकडे पाहून मनाला आनंद मिळतो.
कपडे, अॅक्सेसरीजमध्ये बदल ः रोजच्यापेक्षा कपड्यांमध्ये तसेच त्या जोडीला वापरत असणारे अॅक्सेसरीजमध्ये मुद्दाम बदल करून पाहा. वेगळ्या लूकमध्ये वावरल्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास येईल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करताना सकारात्मक द़ृष्टिकोन मनात कायम ठेवा.
The post कंटाळा आलाय? appeared first on पुढारी.
कंटाळा आलाय, बोअर होतंय, काय करावं ते सुचतंच नाही, असं आपलं बरेचदा होतं; पण काय करावं ते सुचत नाही तेव्हा या टिप्स ट्राय करून बघा. कलागुणांना द्या वाव ः प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त इच्छा पूर्ण होतातच असे नाही. पेंटर, डान्सर, सिंगर, गार्डनिंग असो की स्वयंपाक किंवा आणखी काहीतरी; आवडत्या गुणाला आपल्या व्यस्त प्रोफेशनमुळे वेळ देता येत …
The post कंटाळा आलाय? appeared first on पुढारी.