खोदकामात सापडले होते अख्खे मंदिर

बंगळूर : आपल्या देशात अनेक अनोखी मंदिरे आहेत. काही प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात, विविध कारणांमुळे लोकांच्या द़ृष्टीआड जात असतात. कधी पाण्याखाली, कधी जमिनीखाली तर कधी वाळूखाली अशी मंदिरे, मूर्ती सापडत असतात. कोकणात रेडी येथील भव्य गणेशमूर्तीही अशीच 1976 मध्ये खोदकामात सापडली होती. कर्नाटकात बंगळूरच्या वायव्येस असलेल्या श्री दक्षिणामुखी नंदी तीर्थ कल्याणी क्षेत्र मंदिरही असेच खोदकामात … The post खोदकामात सापडले होते अख्खे मंदिर appeared first on पुढारी.

खोदकामात सापडले होते अख्खे मंदिर

बंगळूर : आपल्या देशात अनेक अनोखी मंदिरे आहेत. काही प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात, विविध कारणांमुळे लोकांच्या द़ृष्टीआड जात असतात. कधी पाण्याखाली, कधी जमिनीखाली तर कधी वाळूखाली अशी मंदिरे, मूर्ती सापडत असतात. कोकणात रेडी येथील भव्य गणेशमूर्तीही अशीच 1976 मध्ये खोदकामात सापडली होती. कर्नाटकात बंगळूरच्या वायव्येस असलेल्या श्री दक्षिणामुखी नंदी तीर्थ कल्याणी क्षेत्र मंदिरही असेच खोदकामात सापडले होते. तेथील नंदीच्या मुखातून अखंड जलधारा बाहेर पडत असते व हे पाणी नंदीच्या खालच्या भागात असलेल्या शिवलिंगावर अखंड जलाभिषेक करते. नंदीच्या मुखातून हे पाणी कुठून येते हे आजपर्यंत समजलेले नाही! हा नंदी व त्याखालील शिवलिंग सुंदर पायर्‍या असलेल्या एका जलकुंडाच्या (कल्याणी) काठाला आहे.
जेव्हा काही मजूर या परिसरात खोदकाम करत होते तेव्हा खाली त्यांना आकृतीसारखी एक वस्तू लागली. त्यानंतर तेव्हा संपूर्ण खोदकाम केले गेले तर जमिनीखाली नंदीची प्रतिमा सापडली. आश्चर्य म्हणजे, या नंदीच्या मुखातून सातत्याने पाणी खाली वाहत होते. हे पाणी कुठून वाहतेय याचा शोध मात्र काही लागला नाही. नंदीच्या मुखातून पाणी कुठे पडते याचा शोध घेण्यासाठी आणखी खोदकाम करण्यात आले.
तेव्हा जमिनीच्या खाली एक शिवलिंग असल्याचे आढळले. त्यावर नंदी अभिषेक करतात. हे पाणी नंतर कुंडात जाते. जमिनीखालून नंदीची मूर्ती आणि शिवलिंग आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर राज्य सरकारनेही याबाबत चौकशी करण्यात आली. घटनास्थळी पुरातत्त्व विभागाची टीमही दाखल झाली. 1997 साली हे शिवलिंग आणि नंदीची मूर्ती सापडली होती. या परिसरात आणखी खोदकाम करण्यात आल्यानंतर संपूर्ण मंदिरच समोर आले. पुरातत्त्व विभागाकडून मंदिराचा इतिहास आणि वय जाणून घेण्यासाठी कार्बन डेटिंग करण्यात आली. तेव्हा हे मंदिर 400 वर्षे जुने असल्याचे समोर आले. व गेली अनेक वर्षे हे मंदिर जमिनीखाली होते. 1997 साली हे मंदिर पुन्हा समोर आले.
The post खोदकामात सापडले होते अख्खे मंदिर appeared first on पुढारी.

बंगळूर : आपल्या देशात अनेक अनोखी मंदिरे आहेत. काही प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात, विविध कारणांमुळे लोकांच्या द़ृष्टीआड जात असतात. कधी पाण्याखाली, कधी जमिनीखाली तर कधी वाळूखाली अशी मंदिरे, मूर्ती सापडत असतात. कोकणात रेडी येथील भव्य गणेशमूर्तीही अशीच 1976 मध्ये खोदकामात सापडली होती. कर्नाटकात बंगळूरच्या वायव्येस असलेल्या श्री दक्षिणामुखी नंदी तीर्थ कल्याणी क्षेत्र मंदिरही असेच खोदकामात …

The post खोदकामात सापडले होते अख्खे मंदिर appeared first on पुढारी.

Go to Source