भारतीय क्रिकेट संघ विजयासाठी कवठे येमाईला साकडे
ओतूर : पुढारी वृत्तसेवा भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल क्रिकेट सामन्याकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष लागून राहिलेले आहे, त्यादृष्टीने ओतूरकर नागरिकांनीही मोठी तयारी केली असून ओतूर पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कवठे येमाई माता मंदिरात भारतीय संघाला विजयश्री प्राप्त व्हावी म्हणून जय बजरंग सेवा गणेश मंडळाच्या वतीने देवीला विजयाचे साकडे घालण्यासाठी विधीवत मंत्रोच्चाराच्या जयघोषात रविवारी (दि. १९) सकाळी ठीक ८ वाजता महापुजा करण्यात आली.
त्याशिवाय आपापले दूरदर्शन संच सज्ज ठेवण्यात आले आहेत. फटाक्यांची आतिषबाजी करण्यासाठी विविध आवाजी फटाक्यांचे संकलन मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे समजते, दुपारी २ वाजेनंतर होऊ घातलेल्या फायनल सामन्यामुळे व ओतूर शहरात सार्वजनिक व घरगुती दूरदर्शन वृत्तवाहिन्यावर क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्यासाठी संपूर्ण गावात शुकशुकाट पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा
Maratha Reservation : कालमर्यादा स्पष्टीकरणास मागासवर्ग आयोगाची असमर्थता
रहस्यरंजन : लोप पावलेली संस्कृती
Pune News : पीएमपी चालकाला सिग्नल तोडणे भोवले
The post भारतीय क्रिकेट संघ विजयासाठी कवठे येमाईला साकडे appeared first on पुढारी.
ओतूर : पुढारी वृत्तसेवा भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल क्रिकेट सामन्याकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष लागून राहिलेले आहे, त्यादृष्टीने ओतूरकर नागरिकांनीही मोठी तयारी केली असून ओतूर पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कवठे येमाई माता मंदिरात भारतीय संघाला विजयश्री प्राप्त व्हावी म्हणून जय बजरंग सेवा गणेश मंडळाच्या वतीने देवीला विजयाचे साकडे घालण्यासाठी विधीवत मंत्रोच्चाराच्या जयघोषात …
The post भारतीय क्रिकेट संघ विजयासाठी कवठे येमाईला साकडे appeared first on पुढारी.