Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुंबईहून बंगळूरुला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या फ्लाइटमधील एक प्रवासी स्वच्छतागृहात अडकल्याची घटना समोर आली आहे. विमान प्रवास सुरू असतानाच विमानातील स्वच्छतागृहात दरवाजा खराब झाल्याने सुमारे तासभर हा प्रवासी स्वच्छतागृहात अडकला, अशी माहिती स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (SpiceJet flight News)
या घटनेबाबत माहिती देताना स्पाइस जेट विमान प्रवक्यात्याने म्हटले आहे की, मंगळवारी (दि.१६) एक प्रवासी दुर्दैवाने मुंबई ते बेंगळुरूला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये सुमारे एक तास लॅव्हेटरीमध्ये अडकला. प्रवासादरम्यान विमान हवेत असतानाच विमानातील शौचालयाचा दरवाजात बिघाड झाला. या घटनेनंतर उर्वरित संपूर्ण प्रवासात आमच्या क्रूने प्रवाशाला मदत आणि मार्गदर्शन केले. विमान उतरल्यानंतर एका अभियंत्याने शौचालयाचा दरवाजा उघडला प्रवाशाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यानंतर प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आल्याचे देखील स्पाइसजेट विमान कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. (SpiceJet flight News)
The passenger who got stuck inside the lavatory for about an hour on SpiceJet flight operating from Mumbai to Bengaluru is being provided a full refund: SpiceJet Spokesperson https://t.co/nrrxaDGC4c
— ANI (@ANI) January 17, 2024
SpiceJet flight News: कंपनीच्या चुकीमुळे प्रवाशाला मिळाला परतावा
मुंबई ते बेंगळुरूला चालणाऱ्या स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये सुमारे एक तास शौचालयात अडकलेल्या प्रवाशाला पूर्ण परतावा दिला जात आहे, असे देखील स्पाइसजेटचे प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. (SpiceJet flight News)
हेही वाचा:
SpiceJet : स्पाईसजेट विमानात प्रवाशाने काढले एअरहोस्टेस आणि सहप्रवासी महिलांचे आक्षेपार्ह ‘फोटो’
Kalanithi Maran Vs SpiceJet | कलानिथी मारन विरुद्ध स्पाईसजेट प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय
टेक ऑफवेळी SpiceJet विमानाचे ब्लेड तुटले; मोठी दुर्घटना टळली, कोलकत्ता विमानतळावर हायअलर्ट
The post …अन् तासभर ‘तो’ अडकला उडत्या विमानाच्या स्वच्छतागृहात appeared first on Bharat Live News Media.