बायकोच्या 5 व्या लग्नामुळे पतीची स्वतःला पेटवून आत्महत्या

मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बायकोने पाचवे लग्न केल्याच्या वादातून पतीने स्वतःला पेटवून आत्महत्या केली

बायकोच्या 5 व्या लग्नामुळे पतीची स्वतःला पेटवून आत्महत्या

मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मध्यप्रदेशातील भोपाळ येथे बायकोने पाचवे लग्न केल्याच्या वादातून पतीने स्वतःला पेटवून आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात या व्यक्तीचे आपल्या पत्नीशी वाद झाले नंतर त्याने स्वतःला पेटवले. बायकोच्या पाचव्या लग्नाला घेऊन त्याचे वाद झाले होते.

हा त्या महिलेचा चवथा पती होता. सुनील लोहानी असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. सुनीलची पत्नी तिच्या माहेरी राहत होती.सुनीलचे लग्न 2018 मध्ये झाले होते. गेल्यावर्षी त्यांच्या नात्यात दुरावा आला होता.  महिलेने सुनीलच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कदाचित तो न्यायालयीन खटल्याला कंटाळून त्याने हे प्राणघातक पाऊल उचलले.  

 

लोहानी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडिओ शूट केला होता आणि तो एका सुसाईड नोटसह सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात त्याच्या पत्नीने पाचव्यांदा लग्न केल्यामुळे तो नाराज असल्याचे म्हटले होते.जुनी परिसरात लोहानी यांनी स्वतःवर पेट्रोल फवारून स्वतःला पेटवून घेतल्याची घटना जवळच्या घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Edited by – Priya Dixit

 

Go to Source