Pune : लवळे फाट्यावर एका टेम्पोची तब्बल सहा वाहनांना धडक
पिरंगुट :पुढारी वृत्तसेवा : पुणे-कोलाड महामार्गावर पिरंगुट घाटातून पौडच्या दिशेने विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पोने पाच दुचाकी तर एका कारला धडक देऊन विटा घेऊन जाणारा टेम्पो उलटला आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत .एक डॉक्टर असून ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. बाकीच्यांना पिरंगुट आणि लवळे फाटा परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. चालकाचे टेम्पो वरून नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामध्ये चालक सुद्धा जखमी झालेला आहे.
The post Pune : लवळे फाट्यावर एका टेम्पोची तब्बल सहा वाहनांना धडक appeared first on पुढारी.
पिरंगुट :पुढारी वृत्तसेवा : पुणे-कोलाड महामार्गावर पिरंगुट घाटातून पौडच्या दिशेने विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पोने पाच दुचाकी तर एका कारला धडक देऊन विटा घेऊन जाणारा टेम्पो उलटला आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत .एक डॉक्टर असून ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. बाकीच्यांना पिरंगुट आणि लवळे फाटा परिसरातील खासगी …
The post Pune : लवळे फाट्यावर एका टेम्पोची तब्बल सहा वाहनांना धडक appeared first on पुढारी.