पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या Production Linked Incentive (PLI) या योजनेमुळे जगभरातील कंपन्या भारतात उत्पादन करू लागल्या आहेत. आता डेल, फॉक्सकॉन, एचपी, लेनोव्हा यासह २७ कंपन्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत. या कंपन्यांचे अर्ज मंजुरही करण्यात आले असून लवकरच या कंपन्या भारतात उत्पादन सुरू करणार आहेत. (PLI Scheme)
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती विभागाचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. यातील २३ कंपन्या तातडीने त्यांचे उत्पादन भारतात सुरू करतील, तर उर्वरित चार कंपन्या ९० दिवसांत भारतात उत्पादन सुरू करणार आहेत. या २७ कंपन्यांच्या माध्यमातून देशात ३ हजार कोटींची गुंतवणूक होईल, तर ५० हजार थेट रोजगार उपलब्ध होतील. तसेच अप्रत्यक्षरीत्या दीड लाख रोजगार निर्माण होतील. (PLI Scheme)
या कंपन्या कंप्युटर, लॅपटॉप, सर्व्हर, कंप्युटरला लागणारी इतर उपकरणे यांची निर्मिती करणार आहेत. एकूण ४० कंपन्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले होते, ज्या कंपन्यांना आता मंजुरी दिलेली नाही, त्यांच्याही अर्जावर विचार सुरू आहेत, असे ते म्हणाले.
आयटी क्षेत्रातील हार्डवेअरसाठी PLI योजनेचे पुनर्घटन मे महिन्यात झाले.
ही योजना ६ वर्षांसाठीची आहे. या योजनेतून ३ लाख ३५ हजार कोटींची गुंतवणूक आणि दोन लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. पूर्वी एकूण विक्रीच्या दोन टक्के इतकी सवलत स्थानिकरीत्या झालेल्या उत्पदनांना मिळत होती, ही सवलत आता ५ टक्के इतकी वाढवण्यात आली आहे. तसेच या योजनेत इतरही बदल करण्यात आले आहेत.
हेही वाचा
Subrato Roy Sahara : सुब्रतो राय यांच्या निधनानंतर सहाराचे गुंतवणूकदार होणार ‘बेसहारा’?
अन्न प्रक्रिया क्षेत्रात झाली 50 हजार कोटींची गुंतवणूक
वस्त्रोद्योगासाठी साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक : चंद्रकांत पाटील
The post या’ एका निर्णयामुळे 50 हजार नोकऱ्या, ३ हजार कोटींची गुंतवणूक appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या Production Linked Incentive (PLI) या योजनेमुळे जगभरातील कंपन्या भारतात उत्पादन करू लागल्या आहेत. आता डेल, फॉक्सकॉन, एचपी, लेनोव्हा यासह २७ कंपन्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत. या कंपन्यांचे अर्ज मंजुरही करण्यात आले असून लवकरच या कंपन्या भारतात उत्पादन सुरू करणार आहेत. (PLI Scheme) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती विभागाचे …
The post या’ एका निर्णयामुळे 50 हजार नोकऱ्या, ३ हजार कोटींची गुंतवणूक appeared first on पुढारी.