पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड सुपरमॉडल ॲश्ले ग्राहमने पहिल्यांदाच साडी नेसली आणि मॉडल एल्सा होस्कने मुंबईतील नव्य लक्झरी जियो वर्ल्ड प्लाझामध्ये जलवा दाखवला. (Ashley Graham) ॲश्लेने ३१ ऑक्टोबरला कार्यक्रमातील एक मजेशीर बीटीएस व्हिडिओ शेअर केला होता. आता ‘भारतातील आपले ४८ तास’चे डॉक्युमेंटेशन करत तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये, ती रणवीर सिंह आणि सोनम कपूर सारख्या बॉलीवूड सेलेब्ससोबत दिसत आहे आणि अंबानी परिवाराविषयी बोलताना दिसतेय. (Ashley Graham)
संबंधित बातम्या –
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक
Miss Universe 2023 : कोण आहे श्वेता शारदा, मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार
Alia Bhatt Bold Look : आलिया भट्टचा ब्राऊन ड्रेसमध्ये बोल्ड लूक, एका बाळाची आई…
जियो वर्ल्ड प्लाझाच्या कार्यक्रमात मुकेश अंबानी, नीता अंबानी, ईशा अंबानी आणि त्यांच्या परिवाराने एक ग्रँड लॉन्च कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये आलिया भट्ट ते करीना कपूरपर्यंत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी दिसले होते. गुरुवारी शेअर करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम रील्समध्ये, ॲश्ले ग्राहमने म्हटले की, तिला विश्वास होत नाहीये की, अंबानी परिवाराने केवळ काही आठवड्यांमध्ये भव्य लॉन्च कार्यक्रम आयोजित केलं.
View this post on Instagram
A post shared by A S H L E Y G R A H A M (@ashleygraham)
ॲश्लेची छोटा आणि प्रेमळ भारत प्रवास
व्हिडिओची सुरुवात ॲश्लेच्या ‘इट्स माय बर्थडे’ गाणे, जेवण, मद्य, मुंबईतील कनेक्टिंग फ्लाईटमधून झाली. अबू धाबीमध्ये थांबल्यानंतर ती ’३० तासांचा’ प्रवास केल्यानंतर मॉडल भारतात पोहोचली. जेव्हा ती हॉटेलमध्ये पोहोचली आणि ‘सर्वात अद्भुत स्वागत’ केलं. तिने सांगितलं की, “अखेर मी भारतात आहे! भारत नेहमीच माझ्या बकेट लिस्टमध्ये राहिलं आहे.”
ॲश्लेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिची खोली फुलांनी, ‘बर्थडे ट्रीट्स’ आणि तिच्या फोटोंनी सजवण्यात आलं होतं. यानंतर तिने मुंबई विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठी एक क्लिप केली. “जेव्हा मी उतरले, तेव्हा माझे पासपोर्ट हरवले. पण ठिक आहे. ते १५ मिनिटांत मिळालेदेखील,” असे तिने म्हटले.
View this post on Instagram
A post shared by A S H L E Y G R A H A M (@ashleygraham)
The post ‘भारतातील ४८ तास’ | ॲश्ले ग्राहमने सांगितला ‘तो’ किस्सा, रणवीरसोबत… appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड सुपरमॉडल ॲश्ले ग्राहमने पहिल्यांदाच साडी नेसली आणि मॉडल एल्सा होस्कने मुंबईतील नव्य लक्झरी जियो वर्ल्ड प्लाझामध्ये जलवा दाखवला. (Ashley Graham) ॲश्लेने ३१ ऑक्टोबरला कार्यक्रमातील एक मजेशीर बीटीएस व्हिडिओ शेअर केला होता. आता ‘भारतातील आपले ४८ तास’चे डॉक्युमेंटेशन करत तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. क्लिपमध्ये, ती रणवीर सिंह आणि सोनम …
The post ‘भारतातील ४८ तास’ | ॲश्ले ग्राहमने सांगितला ‘तो’ किस्सा, रणवीरसोबत… appeared first on पुढारी.