RBI चे माजी गव्हर्नर एस.वेंकटरमणन यांचे निधन
पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एस वेंकटरमणन यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षा अखेरचा श्वास घेतला. व्यंकटरमणन हे RBI चे १८ वे गव्हर्नर होते. १९९० ते १९९२ पर्यंत त्यांनी RBI गव्हर्नर म्हणून पद भूषवले. (S.Venkitaramanan Passed Away)
१९८५ ते १९८९ या काळात त्यांनी वित्त मंत्रालयात वित्त सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली गिरिजा आणि सुधा असा परिवार आहे. त्यांची मुलगी गिरिजा वैद्यनाथनक या तामिळनाडूच्या माजी मुख्य सचिव होत्या.
Former #RBI Governor S Venkitaramanan dies at 92https://t.co/RzLPDetLgB
— Onmanorama (@Onmanorama) November 18, 2023
वेंकटरमणन यांच्या कार्यकाळाचे आपल्या वेबसाइटवर वर्णन करताना, आरबीआयने म्हटले की, ‘त्यांच्या कार्यकाळात देशाला जागतिक आघाडीवर प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या व्यवस्थापनाने देशाला पेमेंट संतुलनाच्या संकटातून बाहेर काढले. त्यांच्या कार्यकाळात, भारताने IMF चा स्थिरीकरण कार्यक्रम स्वीकारला, जिथे रुपयाचे अवमूल्यन झाले आणि आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरू केला गेला.
The post RBI चे माजी गव्हर्नर एस.वेंकटरमणन यांचे निधन appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एस वेंकटरमणन यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षा अखेरचा श्वास घेतला. व्यंकटरमणन हे RBI चे १८ वे गव्हर्नर होते. १९९० ते १९९२ पर्यंत त्यांनी RBI गव्हर्नर म्हणून पद भूषवले. (S.Venkitaramanan Passed Away) १९८५ ते १९८९ या काळात त्यांनी वित्त मंत्रालयात …
The post RBI चे माजी गव्हर्नर एस.वेंकटरमणन यांचे निधन appeared first on पुढारी.