ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ तायवाडे फडणवीसांच्या भेटीला

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  न्या. शिंदे समिती कुणबी जातीची नोंद शोधण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे. आमची मागणी आहे की, शिंदे समितीने ओबीसी समाजाच्या इतर जातींबद्दलही शोध घ्यावा. त्यामुळे या जातीतील अशा व्यक्तींना ज्यांची जातीची नोंद असूनही त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नसेल, त्यांना मदत होईल, असे झाल्यास शिंदे समितीच्या कामाचा लाभ इतर जातींनाही होईल, असे … The post ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ तायवाडे फडणवीसांच्या भेटीला appeared first on पुढारी.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ तायवाडे फडणवीसांच्या भेटीला

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  न्या. शिंदे समिती कुणबी जातीची नोंद शोधण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे. आमची मागणी आहे की, शिंदे समितीने ओबीसी समाजाच्या इतर जातींबद्दलही शोध घ्यावा. त्यामुळे या जातीतील अशा व्यक्तींना ज्यांची जातीची नोंद असूनही त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नसेल, त्यांना मदत होईल, असे झाल्यास शिंदे समितीच्या कामाचा लाभ इतर जातींनाही होईल, असे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले. OBC Reservation
एकीकडे मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सभा, आक्रमक भाषणाच्या पाठोपाठ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील निवासस्थानी ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी भेट घेतली.  २९ सप्टेंबरला राज्य सरकारसोबत जी बैठक झाली. त्यामध्ये सरकार आणि प्रशासनाकडून ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज पावणे दोन महिने झाले, तरी काही मागण्यांसंदर्भात काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे त्याची आठवण करून देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. OBC Reservation
हिवाळी अधिवेशनामध्ये ८ डिसेंबररोजी  मराठा समाजाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनात एक दिवस ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेळ राखीव ठेवून चर्चा करावी, अशी मागणी आम्ही केली. नुकतेच सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाच्या मागासलेपणाचे प्रकरण पुन्हा नव्याने देऊन मराठा समाज मागास सिद्ध होऊ शकतो का? या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण करावे, अशी विनंती केली आहे.
त्या संदर्भात आमची विनंती आहे की, मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातींना वगळून मराठा समाज मागास आहे का? याचा अभ्यास करावा. या सहा जाती आधीच ओबीसी समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करताना या जातींना वगळून सर्वेक्षण करावे, अशी आमची मागणी आहे. यावर डॉ.  तायवाडे यांनी भर दिला. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसी महत्वाच्या आहेत. याशिवाय कायदा होऊ शकत नाही, याकडे लक्ष वेधले.
हेही वाचा 

नागपूरमधूनच विधानसभा निवडणूक लढविणार; लोकसभा लढविण्याच्या चर्चेवर फडणवीसांचा पूर्णविराम
Nagpur Winter Session : यंदा नागपूरमधील हिवाळी अधिवेशन झटपट गुंडाळणार?
नाशिकचे शेतकरी नागपूर अधिवेशनात करणार अन्नत्याग आंदोलन

The post ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ तायवाडे फडणवीसांच्या भेटीला appeared first on पुढारी.

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  न्या. शिंदे समिती कुणबी जातीची नोंद शोधण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहे. आमची मागणी आहे की, शिंदे समितीने ओबीसी समाजाच्या इतर जातींबद्दलही शोध घ्यावा. त्यामुळे या जातीतील अशा व्यक्तींना ज्यांची जातीची नोंद असूनही त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नसेल, त्यांना मदत होईल, असे झाल्यास शिंदे समितीच्या कामाचा लाभ इतर जातींनाही होईल, असे …

The post ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ तायवाडे फडणवीसांच्या भेटीला appeared first on पुढारी.

Go to Source