छ. संभाजीनगर : पैठण येथे छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ रास्ता रोको
पैठण, पुढारी वृत्तसेवा: अंबड येथील ओबीसी एल्गार सभेत राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ व इतर नेत्यांनी मराठा समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य केले. त्याचबरोबर खालच्या पातळीत टीका केली. याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर आज (दि.१८) रास्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. Chhagan Bhujbal
मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. Chhagan Bhujbal
संविधानिक पदावर मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांचा राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा. राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी प्रशासनाकडे लावून धरली.
या मागण्यांचे निवेदन सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे, तलाठी सोनवणे यांना देण्यात आले. याप्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे, जमादार करतासिंग सिंगल, राजेश चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा
छत्रपती संभाजीनगर : दुचाकी- टँकरच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : घरात २२ लाख अन् चावी दारात, निष्काळजीपणामुळे जालाननगरमध्ये घरफोडी
छत्रपती संभाजीनगर शहरात एकच दिवशी आगीच्या आठ घटना
The post छ. संभाजीनगर : पैठण येथे छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ रास्ता रोको appeared first on पुढारी.
पैठण, पुढारी वृत्तसेवा: अंबड येथील ओबीसी एल्गार सभेत राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ व इतर नेत्यांनी मराठा समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य केले. त्याचबरोबर खालच्या पातळीत टीका केली. याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर आज (दि.१८) रास्ता रोको आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. …
The post छ. संभाजीनगर : पैठण येथे छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ रास्ता रोको appeared first on पुढारी.