नगर झेडपीत ‘टक्केवारी’ला बसणार चाप !
नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठेकेदारांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली आहे. आता डिसेंबरमध्ये निविदेपासून कार्यारंभ आदेश ते बिले पास होईपर्यंतची सर्व प्रक्रिया सॉफ्टवेअर प्रणालीव्दारे राबविली जाणार आहे. त्यामुळे ‘नो पेन्डसी’ दिसून प्रशासन गतीमान होईलच, शिवाय ठेकेदारांना बसणारी ‘टक्केवारी’ची झळही कमी होणार आहे. जिल्हा परिषदेतून होणार्या सर्वच विभागातील विकास कामांचा ‘टक्का’ नेहमीच चर्चेत असतो. काम मंजुरीपासून ते निविदा प्रक्रिया, त्यात कागदपत्रांनुसार पात्र-अपात्र प्रक्रिया, पुढे कार्यारंभ आदेश, बिले मंजुरी यासह अन्य वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या-त्या विभागातील ‘यंत्रणा’ कार्यरत आहे.
त्यामुळे ठेकेदारांमधूनही या विषयी अनेकदा खासगीत नाराजी व्यक्त केली जाते. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता व गतीमानता आणण्यासाठी एका अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीव्दारे निविदा ते बिले पास होईपर्यंतची सर्व प्रक्रियेवर आता मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह संभाजी लांगोरेंचाही वॉच असणार आहे. त्यामुळे या प्रणालीव्दारे नेमलेले कर्मचार्यांच्या टेबलवर कोणतीही फाईल पेन्डींग राहणार नाही. वेळेतच ‘त्या’ सॉफ्टेवअरवर त्याबाबतची नोंद केली जाणार आहे. तशी माहिती सॉफ्टवेअरही दिसणार आहे.
ठेकेदारांना झेडपीत येण्याची गरज नाही
निविदा प्रक्रियेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ठेेकेदार थेट कर्मचार्यांच्या टेबलजवळ घुटमळताना दिसत होते. मात्र या प्रणालीव्दारे आता जिल्हा परिषदेत न येताही ऑनलाईन माहिती समजणार आहे. त्यासाठी स्थानिक पंचायत समिती किंवा अन्य अधिकृत वेबसाईटवर तशी व्यवस्था केली जाणार आहे. यातून ठेकेदारांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात श्रीगणेशा!
जिल्हा परिषदेतून आता सर्वच विभागातील 2023-24 मधील कामांच्या प्रशासकीय मान्यता पूर्ण झालेल्या आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया याच ऑनलाईन प्रणालीव्दारे केली जाणार आहे. कामांचे अंदाजपत्रकही याच प्रणालीत आणि अगदी काही मिनिटातच तयार होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली आहेत.
नाशिक पॅर्टनची ‘त्या’ सॉफ्टवेअरशी तुलना!
नाशिक जिल्हा परिषदेत कार्यारंभ आदेश देण्याची जबाबदारी ही त्या-त्या विभागाची होती. मात्र आर्थिक तक्रारीनंतर त्या ठिकाणचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिवाळीनंतर कार्यारंभ आदेश थेट आपल्या स्वाक्षरीने देण्याचा निर्णय घेतला आहे. अगदीच तीच परिस्थिती नगरमध्येही आहे. मात्र आता येथे सर्व प्रक्रियाही सॉफ्टेवेअरव्दारे केली जाणार असल्याने निश्चितच नगरच्या ‘टक्केवारी’ला लगाम बसेल, अशी चर्चा आहे.
वेगवेगळ्या विभागातील निविदा प्रक्रियेपासून ते कामाच्या सध्यस्थितीबाबतची अपटूटेड माहिती आता सॉफ्टवेअर प्रणालीवर भरली जाईल. यातून नो पेन्डन्सी दिसेल तसेच प्रशासन आणखी गतीमान होईल.
– संभाजी लांगोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
The post नगर झेडपीत ‘टक्केवारी’ला बसणार चाप ! appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठेकेदारांना दिवाळीची अनोखी भेट देण्यात आली आहे. आता डिसेंबरमध्ये निविदेपासून कार्यारंभ आदेश ते बिले पास होईपर्यंतची सर्व प्रक्रिया सॉफ्टवेअर प्रणालीव्दारे राबविली जाणार आहे. त्यामुळे ‘नो पेन्डसी’ दिसून प्रशासन गतीमान होईलच, शिवाय ठेकेदारांना बसणारी ‘टक्केवारी’ची झळही कमी होणार आहे. जिल्हा परिषदेतून होणार्या सर्वच विभागातील विकास कामांचा ‘टक्का’ नेहमीच …
The post नगर झेडपीत ‘टक्केवारी’ला बसणार चाप ! appeared first on पुढारी.