Nagar : 184 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नगर : पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचासह सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. यापैकी 184 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विद्यमान सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत उपसरपंचाची निवड होणार आहे. या निवडणुकीत सरपंचाला देखील मतदान करण्याचा अधिकार आहे. वडगाव गुप्ता, कान्हूरपठार, पोहेगाव, पुणतांबा, लोणी व्यंकनाथ, मुकिंदपूर, आश्वी खुर्द व बुद्रूक आदीसह 194 ग्रामपंचायतींच्या 5 नोव्हेंबर 2023 रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. सतरा ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायतींत विजयी झालेले सरपंच आणि सदस्यांची यादी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी प्रसिध्द केलेली आहे.
संबंधित बातम्या :
Nagar : मुळा, भंडारदरातून जायकवाडीला पाणी न सोडण्यावर नेत्यांचे एकमत
Weather Update : पुणे, नाशिक गारठले
या ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. त्यामुळे आता उपसरपंचपदाची निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सरपंचपदाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाच्या निवडीसाठी पहिली सभा आयोजित करण्याचे निर्देश निवडणूक यंत्रणेला दिले आहेत.
उपसरपंचपदाची निवडणूक 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाची निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी वडगाव गुप्ता, कान्हूरपठार, लोणी व्यंकनाथ, आश्वी खुर्द व बुद्रूक, फत्याबाद यासह 122 ग्रामपंचायतींच्या, 24 नोव्हेंबर रोजी पोहेगाव, पुणतांबा, टाकळीमियाँ, मुकिंदपूर यासह 55 ग्रामपंचायतींच्या तर 25 नोव्हेंबर रोजी 6 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाची निवडणूक होणार आहेत. उर्वरित 10 ग्रामपंचायतींचा डिसेंबर महिन्यात कालावधी संपणार आहे. कालावधी संपताच तेथील उपसरपंचाची निवडणूक घेतली जाणार आहे.
नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार असली तरी ही निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी प्रत्येक ग्रामपंचायतींसाठी वर्ग दोनच्या राजपत्रित अधिकार्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.यामध्ये नायब तहसीलदार, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपअधीक्षक भूअभिलेख, सहाय्यक अभियंता, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांचा समावेश आहे.
सरपंचाला दोन मतांचा अधिकार
थेट सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंचाला शासनाने अधिक अधिकार दिले आहेत. पहिले दोन वर्षे त्यांच्यावर अविश्वास आणता येत नाही. त्यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवडणूक होते. उपसरपंच निवडणुकीत सरपंच हे सदस्य म्हणून मतदान करणार आहेत. जर उपसरपंच निवडणुकीत दोन उमेदवारांना समान मते पडल्यास एक निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना आहे.
The post Nagar : 184 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्तसेवा : जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचासह सदस्यांच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. यापैकी 184 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विद्यमान सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली 21 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत उपसरपंचाची निवड होणार आहे. या निवडणुकीत सरपंचाला देखील मतदान करण्याचा अधिकार आहे. …
The post Nagar : 184 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.