सांगली : ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात

कडेगांव; पुढारी वृत्तसेवा :  जमिनीची अकृषिक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदाराला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. सुनील जोतिराम चव्हाण (वय ५०) असे या नायब तहसिलदाराचे नाव असून शुक्रवारी (दि.१७) ही कारवाई करण्यात आली. दरम्यान सुनील चव्हाण याच्याविरूध्द कडेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. … The post सांगली : ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

सांगली : ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात

कडेगांव; पुढारी वृत्तसेवा :  जमिनीची अकृषिक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदाराला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. सुनील जोतिराम चव्हाण (वय ५०) असे या नायब तहसिलदाराचे नाव असून शुक्रवारी (दि.१७) ही कारवाई करण्यात आली. दरम्यान सुनील चव्हाण याच्याविरूध्द कडेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची अकृषीक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी नायब तहसीलदार सुनिल चव्हाण याने तक्रारदाराकडे ४५ हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती ४० हजार देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत पथकाशी संपर्क साधला. व याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ लाचलुचपत पथकाने मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कडेगाव या ठिकाणी सापळा रचला व नायब तहसीलदार सुनिल चव्हाण याला ४० हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे पोलीस उप आयुक्त, अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी , पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर, अजित पाटील, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, पोपट पाटील, धनंजय खाडे, अतुल मोरे, सिमा माने, चालक वंटमुरे यांनी केली आहे.
The post सांगली : ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

कडेगांव; पुढारी वृत्तसेवा :  जमिनीची अकृषिक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदाराला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. सुनील जोतिराम चव्हाण (वय ५०) असे या नायब तहसिलदाराचे नाव असून शुक्रवारी (दि.१७) ही कारवाई करण्यात आली. दरम्यान सुनील चव्हाण याच्याविरूध्द कडेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. …

The post सांगली : ४० हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार लाचलुचपतच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Go to Source