नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात दिवाळी मीलन कार्यक्रमानिमित्त पत्रकार बांधवांशी संवाद साधला. उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भारतीय सण, उत्सव, परंपरा यासह व्होकल फॉर लोकल यावरही पंतप्रधानांनी भाष्य केले. कोरोनामुळे जग कठीण काळातून गेले. कोरोना काळानंतर पहिल्यांदा विविध सण- उत्सवांचा आनंद घेता येत आहे. आज आपल्या देशातील सण-उत्सव जगभरात साजरे केले जातात, असेही पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी आरोग्याच्या काळजीकडेही लक्ष वेधले. साधारणत:, वयाच्या चाळिशीनंतर दरवर्षी आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे. माध्यम क्षेत्रातील लोकांचे आयुष्य धकाधकीचे असते, धावपळीचे असते. यासाठी सरकारसह माध्यम क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन काही यंत्रणा तयार करता येईल का, याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, माध्यमांना प्रभावी बनवण्यासाठी समाज माध्यमांचाही वापर चांगला केला जात आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव वेगाने आपल्या विविध व्यवस्थांवर दिसत आहे. स्वच्छता अभियानाला माध्यमांनी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवले, यासाठी त्यांनी सर्वच माध्यमांचे आभार व्यक्त केले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डीपफेक यासारख्या तंत्रज्ञानामुळे काही आव्हाने आपल्यासमोर आहेत. त्यांचाही विचार केला पाहिजे, देशात अनेक लोक आहेत ज्यांना या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या गोष्टींची पुनर्तपासणी करण्याबद्दल कल्पना नाही. त्यामुळे चुकीच्या गोष्टींचे बळी ठरण्याची शक्यता आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा विकास झाला पाहिजे. यातून मोठे लक्ष प्राप्त करता येऊ शकते, असेही ते म्हणाले.
‘पुढारी’च्या वाचकांना पंतप्रधानांच्या खास शुभेच्छा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत पत्रकार बांधवांसाठी ‘दिवाळी मीलन’ कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी दै. ‘पुढारी’चे सहयोगी संपादक श्रीराम जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तेव्हा पंतप्रधानांनीदेखील दै. ‘पुढारी’च्या वाचकांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा म्हणत मराठीतून विशेष शुभेच्छा दिल्या.
The post ‘माध्यमांमुळे स्वच्छता अभियान लोकांपर्यंत पोहोचले’ appeared first on पुढारी.
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी दिल्लीस्थित भाजप मुख्यालयात दिवाळी मीलन कार्यक्रमानिमित्त पत्रकार बांधवांशी संवाद साधला. उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत भारतीय सण, उत्सव, परंपरा यासह व्होकल फॉर लोकल यावरही पंतप्रधानांनी भाष्य केले. कोरोनामुळे जग कठीण काळातून गेले. कोरोना काळानंतर पहिल्यांदा विविध सण- उत्सवांचा आनंद घेता येत आहे. आज आपल्या देशातील सण-उत्सव …
The post ‘माध्यमांमुळे स्वच्छता अभियान लोकांपर्यंत पोहोचले’ appeared first on पुढारी.