चक्क पोलिसच निघाला अट्टल दुचाकीचोर !

निरा : पुढारी वृत्तसेवा : निरा (ता. पुरंदर) येथील पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक त्रासले होते. तर वाढत्या दुचाकी चोर्‍या रोखण्याचे मोठे आव्हान जेजुरी पोलिसांपुढे होते. पोलिसांनी तपासाला गती देत दुचाकीचोरास पकडले देखील; मात्र चौकशीत धक्कादायक गोष्ट समोर आली. ती म्हणजे हा दुचाकी चोरणारा दुसरा-तिसरा कोणी नाही तर चक्क … The post चक्क पोलिसच निघाला अट्टल दुचाकीचोर ! appeared first on पुढारी.

चक्क पोलिसच निघाला अट्टल दुचाकीचोर !

निरा : पुढारी वृत्तसेवा : निरा (ता. पुरंदर) येथील पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक त्रासले होते. तर वाढत्या दुचाकी चोर्‍या रोखण्याचे मोठे आव्हान जेजुरी पोलिसांपुढे होते. पोलिसांनी तपासाला गती देत दुचाकीचोरास पकडले देखील; मात्र चौकशीत धक्कादायक गोष्ट समोर आली. ती म्हणजे हा दुचाकी चोरणारा दुसरा-तिसरा कोणी नाही तर चक्क पोलिस कर्मचारीच निघाला. त्याच्याकडून चोरी केलेल्या तब्बल 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या, तर त्या विकत घेणार्‍या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या :

पुणे : गावठाणातील जुन्या वाड्यांच्या विकसनाचा मार्ग मोकळा
पुणे विभागातील सव्वा दोन लाख नागरिक तहानलेले ; 110 गावांत टँकरने पाणी

विनोद मारुती नामदार (रा. वाणेवाडी, ता. बारामती) असे दुचाकी चोरणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. तर चोरीच्या दुचाकी खरेदी करणार्‍या अस्लम मुलाणी (रा. निरा, ता. पुरंदर) आणि पृथ्वीराज ठोंबरे (रा. मुरूम, ता. बारामती) या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरा हद्दीतील दुचाकी चोरीप्रकरणी तांत्रिक तपास व खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीवरून विनोद नामदार याचा सहभाग दिसून आला. त्याला जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत नामदारने 8 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. नामदार हा पुणे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. तो मूळचा वाणेवाडी येथील रहिवासी आहे.
तो गावी आल्यावर दुचाकी चोरी करत असे. त्यानंतर चोरी केलेल्या दुचाकी वेगवेगळ्या गावांत लोकांना विकत असे. यातील काही दुचाकी खरेदी करणार्‍या अस्लम मुलाणी आणि पृथ्वीराज ठोंबरे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. तर नामदारची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपासात आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
The post चक्क पोलिसच निघाला अट्टल दुचाकीचोर ! appeared first on पुढारी.

निरा : पुढारी वृत्तसेवा : निरा (ता. पुरंदर) येथील पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिक त्रासले होते. तर वाढत्या दुचाकी चोर्‍या रोखण्याचे मोठे आव्हान जेजुरी पोलिसांपुढे होते. पोलिसांनी तपासाला गती देत दुचाकीचोरास पकडले देखील; मात्र चौकशीत धक्कादायक गोष्ट समोर आली. ती म्हणजे हा दुचाकी चोरणारा दुसरा-तिसरा कोणी नाही तर चक्क …

The post चक्क पोलिसच निघाला अट्टल दुचाकीचोर ! appeared first on पुढारी.

Go to Source