Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी केलं यात्रेत ढोलवादन
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : खासदार सुप्रिया सुळे या पुढील निवडणुकीनंतर केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री व्हाव्यात, अशी इच्छा बाबीर बुवाच्या चरणी गजढोल स्पर्धेचे निमंत्रक अमोल भिसे यांनी व्यक्त केली. यावर व्यासपीठावरच असलेले भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सुळे यांचे नाव न घेता, इच्छा पूर्ण होईल हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे, सर्वांच्याच इच्छा, आकांक्षा कशा पूर्ण होतील असं म्हणत चांगलाच चिमटा काढला, त्यावेळी खा. सुळे यांची पाठराखण करत अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मध्येच म्हटलं ‘होतील सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील.’ यावर शिंदे भरणे यांना म्हणाले ‘तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत, सर्वांच्या कशा होतील’ असे म्हणताच एकच हशा पिकला.
बाबीर यात्रेनिमित्त रुई (ता. इंदापूर) या ठिकाणी सर्वजण एकत्रित आले होते. बाबीर देवाची यात्रा दरवर्षी दीपावली पाडव्याच्या दिवशी सुरू होते. बाबीर देवाच्या यात्रेला संपूर्ण राज्यासह इतर राज्यातून भाविक येतात. या यात्रेनिमित्त खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राम शिंदे,आमदार दत्तात्रेय भरणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, अॅड. तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, अमोल भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार भरणे म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून अमोल भिसे यांनी गजढोल व गजनृत्य स्पर्धा जपली आहे. बाबीर मंदिराचा जीर्णोद्धारदेखील पुढील वर्षापर्यंत पूर्ण केला जाईल. खासदार सुळे म्हणाल्या, धनगर व मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा करीत आहे. सध्या दुष्काळात पाण्याचे, चाराटंचाईचे नियोजन करावे लागेल. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही गळ्यामध्ये ढोल अडकवत ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.
हेही वाचा :
या दिवाळीत पुणेकरांकडून 11 कोटींचा घरगुती फराळ फस्त
Pune : समाविष्ट गावांना करसवलतीची 31 जानेवारीपर्यंत मुदत
The post Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी केलं यात्रेत ढोलवादन appeared first on पुढारी.
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : खासदार सुप्रिया सुळे या पुढील निवडणुकीनंतर केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री व्हाव्यात, अशी इच्छा बाबीर बुवाच्या चरणी गजढोल स्पर्धेचे निमंत्रक अमोल भिसे यांनी व्यक्त केली. यावर व्यासपीठावरच असलेले भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सुळे यांचे नाव न घेता, इच्छा पूर्ण होईल हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे, सर्वांच्याच इच्छा, आकांक्षा कशा पूर्ण होतील …
The post Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळेंनी केलं यात्रेत ढोलवादन appeared first on पुढारी.