भारतीय फुटबॉल संघाचा कुवेतवर शानदार विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. सलग 10 सामने जिंकून रोहित सेनेने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये त्यांचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाप्रमाणे आता फुटबॉल संघाने 2026 साली होणाऱ्या विश्वचषक पात्रता फेरीची सुरूवात विजयाने … The post भारतीय फुटबॉल संघाचा कुवेतवर शानदार विजय appeared first on पुढारी.

भारतीय फुटबॉल संघाचा कुवेतवर शानदार विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. सलग 10 सामने जिंकून रोहित सेनेने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये त्यांचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाप्रमाणे आता फुटबॉल संघाने 2026 साली होणाऱ्या विश्वचषक पात्रता फेरीची सुरूवात विजयाने केली आहे. (India vs Kuwait)
क्रिकेटप्रमाणेच आपल्या भारतीय फुटबॉल संघानेही धुमाकूळ घातला आहे. आपण कोणापेक्षा कमी नाही हे त्यांनी सिद्ध केले आहे. सध्या फिफा विश्वचषक 2026 चे क्वालिफायर सामने सुरू आहेत. यातील दुसऱ्या सामन्यात सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघ कुवेतशी भिडला. (India vs Kuwait)
कुवेतमधील जाबेर अल अहमद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यजमान संघाचा 1-0 असा पराभव करत सर्वांना आश्यर्याचा धक्का दिला. सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला मनवीर सिंगने मारलेल्या अप्रतिम शॉट मारत भारतासाठी एकमेव गोल नोंदवला. मनवीरने सामन्यात संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी भारतीय संघाने शेवटपर्यंत राखली. यामुळे भारतीय संघाने कुवेतवर 1-0 अशा फरकाने विजय मिळवला. सामन्याच्या 95 व्या मिनिटाला कुवेतचा खेळाडू फैसल अलहरबीला दुसरे पिवळे कार्ड मिळाले. त्यामुळे त्याला सामन्यातून बाहेर जावे लागले.

✅🇮🇳 Just the start we wanted 🙌#FIFAWorldCup 🏆 #BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/TvP6Wdmq8o
— Indian Football Team (@IndianFootball) November 17, 2023

हेही वाचा :

Maharashtrachi Hasyajatra : खळखळून हसवायला येणार ओंकार भोजने
Madhya Pradesh Assembly elections 2023 | मध्य प्रदेशात दिमानी मतदारसंघात मतदानावेळी दगडफेक, गोळीबार
Nuh Violence | हरियाणातील नूहमध्ये पुन्हा हिंसाचार, विहिरीचे पूजन करणाऱ्या महिलांवर दगडफेक; FIR दाखल

The post भारतीय फुटबॉल संघाचा कुवेतवर शानदार विजय appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. सलग 10 सामने जिंकून रोहित सेनेने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये त्यांचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाप्रमाणे आता फुटबॉल संघाने 2026 साली होणाऱ्या विश्वचषक पात्रता फेरीची सुरूवात विजयाने …

The post भारतीय फुटबॉल संघाचा कुवेतवर शानदार विजय appeared first on पुढारी.

Go to Source