चंदगडला ऊस दरासाठी ट्रॅक्टर पेटवला

चंदगड ; पुढारी वृत्‍तसेवा संपूर्ण महाराष्ट्रभर ऊस दर आंदोलन सुरू आहे. त्‍या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याकडे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर जात असताना चार अज्ञातांनी पेट्रोलचे पेटते बोळे फेकले. यामध्ये ट्रॅक्टर जळून खाक झाला. तावरेवाडी चंदगड येथील ऊत्तम चांदेकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर असल्याचे समजते. ही घटना कर्नाटक बेळगाव सीमा भागांतील बोडकेनट्टी या गावाजवळ … The post चंदगडला ऊस दरासाठी ट्रॅक्टर पेटवला appeared first on पुढारी.

चंदगडला ऊस दरासाठी ट्रॅक्टर पेटवला

चंदगड ; पुढारी वृत्‍तसेवा संपूर्ण महाराष्ट्रभर ऊस दर आंदोलन सुरू आहे. त्‍या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याकडे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर जात असताना चार अज्ञातांनी पेट्रोलचे पेटते बोळे फेकले. यामध्ये ट्रॅक्टर जळून खाक झाला. तावरेवाडी चंदगड येथील ऊत्तम चांदेकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर असल्याचे समजते. ही घटना कर्नाटक बेळगाव सीमा भागांतील बोडकेनट्टी या गावाजवळ घडली.
सीमा भागातील ऊस चंदगड तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याला येत असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी ट्रॅक्‍टरवर पेट्रोलचे बोळे फेकले. या आगीत ट्रॅक्टर जळून खाक झाला. दरम्यान दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांचे हेमरस साखर कारखान्यावर ऊस दरासाठी उपोषण सुरू आहे. सकाळी कर्नाटक पोलिसांनी या संघटनेला विचारले असता, संघटनेचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : 

कोल्‍हापूर : ‘शाहूवाडी’त आढळल्या ६ हजार ५४२ कुणबी नोंदी 
‘फोडाफोडीत लक्ष देणार्‍या केंद्राचा व्यापारी धोरणांशी संवाद नाही’ : शरद पवार 
UAE News | भारतीय कामगाराचे दुबईत नशीब पालटले, तब्बल ४५ कोटींची लॉटरी जिंकली 

The post चंदगडला ऊस दरासाठी ट्रॅक्टर पेटवला appeared first on पुढारी.

चंदगड ; पुढारी वृत्‍तसेवा संपूर्ण महाराष्ट्रभर ऊस दर आंदोलन सुरू आहे. त्‍या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याकडे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर जात असताना चार अज्ञातांनी पेट्रोलचे पेटते बोळे फेकले. यामध्ये ट्रॅक्टर जळून खाक झाला. तावरेवाडी चंदगड येथील ऊत्तम चांदेकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर असल्याचे समजते. ही घटना कर्नाटक बेळगाव सीमा भागांतील बोडकेनट्टी या गावाजवळ …

The post चंदगडला ऊस दरासाठी ट्रॅक्टर पेटवला appeared first on पुढारी.

Go to Source