लूटमार करणार्‍या खासगी बसचालकांना दणका

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीच्या काळात बाहेरगावी जाणार्‍या प्रवासी नागरिकांची अडवणूक करून अवाच्या सव्वा भाडे उकळणार्‍या 129 खासगी बसचालकांवर पुणे आरटीओकडून धडक कारवाई केली आहे. गेली 15 दिवसांत पुणे आरटीने खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी केली. त्याकरिता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी आरटीओच्या वायुवेग पथकाला 129 वाहने दोषी आढळली. … The post लूटमार करणार्‍या खासगी बसचालकांना दणका appeared first on पुढारी.

लूटमार करणार्‍या खासगी बसचालकांना दणका

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीच्या काळात बाहेरगावी जाणार्‍या प्रवासी नागरिकांची अडवणूक करून अवाच्या सव्वा भाडे उकळणार्‍या 129 खासगी बसचालकांवर पुणे आरटीओकडून धडक कारवाई केली आहे. गेली 15 दिवसांत पुणे आरटीने खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी केली. त्याकरिता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी आरटीओच्या वायुवेग पथकाला 129 वाहने दोषी आढळली. त्यामुळे आरटीओने या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या वाहनचालकांकडून आरटीओने 8 लाख 61 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आरटीओने ही कारवाई दि. 1 ते 16 नोव्हेंबर 2023 दरम्यान हाती घेतली होती.
तक्रारीसाठी व्हॉट्सअप क्रमांक…
पुणे आरटीओने मनमानी भाडे आकारणार्‍या वाहनचालकांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक तयार केला असून, त्यावर गेली 15 दिवसांत 37 प्रवाशांच्या तक्रारी आल्या. त्याची शहानिशा करून आरटीओकडून संबंधित वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. प्रवाशांनी याबाबत 8275330101 या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करावी. त्यावर प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, प्रवास मार्ग, बस क्रमांक, बस प्रकार, बसचा फोटो, तिकीटाचा फोटो याचा तपशील पाठवावा. असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
खासगी बसचालकांनी दिवाळी काळात बाहेर गावी जाणार्‍या प्रवाशांकडून अधिकचे भाडे घेऊ नये, याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्या मोहिमेनुसार मोटार वाहन कायद्यातील नियमांचे भंग करणार्‍या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. खासगी बसचालकांनी प्रवाशांकडून अधिकचे भाडे घेऊ नये, ही मोहीम येथून पुढे देखील सुरू राहील.
संबंधित बातम्या :

Balasaheb Thackeray | “आजोबा नातवाचा पहिला मित्र”, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट
पुणेकरांनी या दिवाळीत केली 25 हजार नव्या वाहनांची खरेदी

 
The post लूटमार करणार्‍या खासगी बसचालकांना दणका appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीच्या काळात बाहेरगावी जाणार्‍या प्रवासी नागरिकांची अडवणूक करून अवाच्या सव्वा भाडे उकळणार्‍या 129 खासगी बसचालकांवर पुणे आरटीओकडून धडक कारवाई केली आहे. गेली 15 दिवसांत पुणे आरटीने खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी केली. त्याकरिता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यावेळी आरटीओच्या वायुवेग पथकाला 129 वाहने दोषी आढळली. …

The post लूटमार करणार्‍या खासगी बसचालकांना दणका appeared first on पुढारी.

Go to Source