पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीनिमित्त ‘देसी ध्वनी रेकॉर्ड’ने ‘दिवाली आयो रे’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. हे गाणं ‘देसी ध्वनी रेकॉर्ड’च्या युट्युब चॅनलवर पाहता येईल. भगवान श्रीराम अयोध्येहून परतले आणि तेथील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी कशी पहिली दिवाळी साजरी केली, हे या गाण्याद्वारे रसिकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या –
Sunny Leone : मला असे काहीतरी करावे लागले, जे मी आधी कधीच केले नव्हते
Marathi TV Serials : सारं काही तिच्यासाठी, तुला शिकवीन…मालिकांचा महासंगम
History Hunter : सरस्वती नदी ही केवळ दंतकथा आहे का वस्तुस्थिती, उलगडणार कोडे
इंडियन आयडल २०२३ चा विजेता ऋषी सिंह याने हे गीत स्वरबद्ध केले असून संगीत जितुल बोरा यांनी दिले आहे. याची निर्मिती जगदीशचंद्र पाटील यांनी केली आहे. तर दिग्दर्शन विजय बूटे यांचे आहे. मोनाली गुळवे यांनी कार्यकारी निर्मातीची धुरा सांभाळली आहे.
या गाण्यात रवि भाटिया, अनुजा शिंदे आणि हर्ष नायर यांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘देसी ध्वनी रेकॉर्ड’ने सादर केलेले हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहेत. यावर अनेक रिल्स देखील करण्यात आले आहेत. सध्या हे गाणं ट्रेडिंगमध्ये आहे. ‘देसी ध्वनी रेकॉर्ड्स’ एक कौटुंबिक आणि धार्मिक गीत घेऊन आले आहे जे या गाण्याच्या माध्यमातून सनातन धर्माचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहे.
The post Trending Song : ‘दिवाली आयो रे’ गाण्याची प्रेक्षकांना भुरळ appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीनिमित्त ‘देसी ध्वनी रेकॉर्ड’ने ‘दिवाली आयो रे’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. हे गाणं ‘देसी ध्वनी रेकॉर्ड’च्या युट्युब चॅनलवर पाहता येईल. भगवान श्रीराम अयोध्येहून परतले आणि तेथील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी कशी पहिली दिवाळी साजरी केली, हे या गाण्याद्वारे रसिकांना पाहायला मिळणार आहे. संबंधित बातम्या – Sunny Leone : मला …
The post Trending Song : ‘दिवाली आयो रे’ गाण्याची प्रेक्षकांना भुरळ appeared first on पुढारी.