उत्तराखंडमध्ये प्रथमच हिवाळ्यात चारधाम यात्रा, २७ डिसेंबरपासून होणार प्रारंभ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तराखंडमध्ये प्रथमच हिवाळ्यातील चारधाम यात्रेला २७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. साधारणपणे उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा उन्हाळ्यात सुरू होते; परंतु पहिल्यांदाच हिवाळी यात्रा होणार आहे. जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे या यात्रेला प्रारंभ करतील. दरम्यान, शंकराचार्यांच्या प्रतिनिधींनी आज ( दि.२४) उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेतली. त्यांना धामी यांनी चारधाम यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सात दिवस चालणाऱ्या हिवाळी चारधाम यात्रेला २७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर २ जानेवारीला हरिद्वारमध्ये त्याची सांगता होणार आहे.
शंकराचार्यांच्या भेटीला ऐतिहासिक असल्याचे सांगत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, त्यांच्या यात्रेमुळे चार धामांच्या हिवाळी प्रवासाला प्रोत्साहन मिळेल. या यात्रेचा समारोप 2 जानेवारीला हरिद्वार येथे होणार आहे.
ज्योतिर्मठचे प्रभारी मुकुंद ब्रह्मचारी म्हणाले की, सर्वसामान्यांची ही संकल्पना दूर करण्यासाठी आणि देवतांच्या हिवाळी मुक्कामाच्या ठिकाणी दर्शनाची परंपरा उत्तराखंडच्या हिवाळी चारधाम तीर्थयात्रेला सुरू करण्यासाठी ‘जगद्गुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती’ येथून उपस्थित राहणार आहेत. 27 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत प्रवास करतील. एकीकडे प्रवाशांना देव दर्शनाचा धार्मिक-आध्यात्मिक लाभ मिळणार आहे. हिवाळ्यात शंकराचार्य चारधामला भेट देतील तेव्हा हा प्रवास ऐतिहासिक असेल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
Cold Wave grips Delhi-NCR : दिल्लीतील थंडीमुळे नागरिकांना प्रदूषणाचा धोका; श्वसनासह डोळ्यांच्या तक्रारीत वाढ
Brij Bhushan On WFI Suspension : WFI कार्यकारिणी निलंबनावर बृजभूषण सिंह म्हणाले, “मी कुस्ती खेळाच्या…”
The post उत्तराखंडमध्ये प्रथमच हिवाळ्यात चारधाम यात्रा, २७ डिसेंबरपासून होणार प्रारंभ appeared first on Bharat Live News Media.