दिल्लीतील थंडीमुळे नागरिकांना प्रदूषणाचा धोका; श्वसनासह डोळ्यांच्या तक्रारीत वाढ
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे राजधानीत थंडी वाढत असल्याचे चित्र सध्या आहे. मात्र, रविवारी दिल्लीचे किमान तापमान ७.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. शनिवारी हे तापमान ९.६ अंश सेल्सिअस इतके होते. काही भागात किमान तापमान ८.७ अंशांवर नोंदवले गेले. (Cold Wave grips Delhi-NCR)
दिल्लीतील बहुतांश भागात लोकांना श्वसन घेण्यास त्रास होत आहे. हवामानातील बदल आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे परिस्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. दाट धुक्यामुळे लोकांना प्रदूषित हवेचा श्वास घ्यावा लागत आहे. लोकांच्या डोळ्यात जळजळ होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शनिवारी (दि. २३) एनसीआरमध्ये सर्वाधिक हवा प्रदूषित होती. हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) 450 नोंदवला गेला, जो अत्यंत गंभीर श्रेणीत आहे. त्यात शुक्रवारच्या तुलनेत ४१ निर्देशांकांची वाढ नोंदवण्यात आली. वजीरपूर, जहांगीरपुरी आणि मुंडका येथे AQI 500 च्या जवळपास नोंदवला गेला. त्याच वेळी, दिल्लीतील बहुतेक भागात AQI 400 च्या पुढे राहिला.
दिल्लीनंतर एनसीआरमध्ये नोएडा सर्वाधिक प्रदूषित आहे. दुपारी सूर्य बाहेर उजाडल्यानंतरही धुक्यापासून दिलासा मिळाला नाही. एवढेच नाही तर सायंकाळी परिस्थिती अधिक गंभीर झाली. दिल्लीतील एकूण हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर श्रेणीत नोंदवली गेली असल्याने कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती मंगळवारपर्यंत कायम राहणार असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
हेही वाचा
Blue Zone Diet : काय आहे शतायुषी लोकांचा ‘ब्लू झोन’ आहार? जाणून घ्या निरोगी जीवनाचं रहस्य
Health Tips : ‘हे’ पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये!
Health is the real wealth : चांगल्या आरोग्यासाठी दहा टिप्स!
The post दिल्लीतील थंडीमुळे नागरिकांना प्रदूषणाचा धोका; श्वसनासह डोळ्यांच्या तक्रारीत वाढ appeared first on Bharat Live News Media.