गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह ३ ट्रॅक्टरची जाळपोळ
गडचिरोली ; Bharat Live News Media वृत्तसेवा सशस्त्र नक्षल्यांनी (मंगळवार) रात्री भामरागड तालुक्यातील हिदूर-पोयरकोटी रस्त्याच्या कामावरील एक जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरची जाळपोळ केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून हिदूर-पोयरकोटी रस्त्याचे काम सुरू असून, मंगळवारी संध्याकाळी काम आटोपल्यानंतर वाहन चालकांनी ट्रॅक्टर आणि जेसीबी हिदूर गावानजीक रस्त्याच्या कडेला उभी केली होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नक्षलवादी तेथे गेले. त्यांनी डीझेल ओतून जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरला आग लावली. आज (बुधवार) सकाळी जाळपोळीची घटना नागरिकांच्या लक्षात आली.
घटनास्थळी नक्षल्यांची पत्रके असून, बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशातील प्रतिक्रांतीवादी हल्ल्यांच्या विरोधात २२ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा :
COVID-19 : ‘घाबरू नका, सतर्क रहा’; कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
दहशतवादी पन्नून हत्या कटाबाबत अमेरिकेच्या आरोपावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
IPL Auction Sameer rizvi : चेन्नई सुपर किंग्जची ‘रैना-2’ साठी ८. ४० कोटींची बोली!, कोण आहे समीर रिझवी?
The post गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह ३ ट्रॅक्टरची जाळपोळ appeared first on Bharat Live News Media.