‘तुम्‍हाला हिंदी भाषा समजली पाहिजे…’ : नितीश कुमार ‘द्रमुक’ नेत्‍यावर भडकले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भाजपविरोधी इंडिया आघाडीची बैठक मंगळवार, १९ डिसेंबर रोजी दिल्‍लीत झाली. या बैठकीत बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्‍या भाषणाचा अनुवाद द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते टीआर बालू यांनी मागितला. यावर नितीश कुमार चांगलेच भडकले. त्‍यांनी टीआर बालू यांना हिंदी भाषेचे महत्त्‍व सांगत भाषणाचा अनुवाद केला जाणार नाही, असे स्‍पष्‍ट केले. इंडिया … The post ‘तुम्‍हाला हिंदी भाषा समजली पाहिजे…’ : नितीश कुमार ‘द्रमुक’ नेत्‍यावर भडकले appeared first on पुढारी.
‘तुम्‍हाला हिंदी भाषा समजली पाहिजे…’ : नितीश कुमार ‘द्रमुक’ नेत्‍यावर भडकले


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : भाजपविरोधी इंडिया आघाडीची बैठक मंगळवार, १९ डिसेंबर रोजी दिल्‍लीत झाली. या बैठकीत बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्‍या भाषणाचा अनुवाद द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते टीआर बालू यांनी मागितला. यावर नितीश कुमार चांगलेच भडकले. त्‍यांनी टीआर बालू यांना हिंदी भाषेचे महत्त्‍व सांगत भाषणाचा अनुवाद केला जाणार नाही, असे स्‍पष्‍ट केले.
इंडिया आघाडी बैठकीत नेमकं काय घडलं?
आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि प्रचाराची रणनीती ठरविण्‍यासाठी मंगळवारी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक बोलविण्‍यात आली होती. यावेळी नितीश कुमार यांनी आपलं भाषण झालं. यावेळी नितीश कुमार काय बोलताय हे समजू न शकल्याने टीआर बालू यांनी राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभा खासदार मनोज के. झा यांना भाषणाचा अनुवाद करण्‍याचा इशारा केला.
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे…
मनोज झा यांनी भाषणाचेश भाषांतर करण्‍याची परवानगी नितीश कुमार यांच्याकडे मागितली. यावर नितीश कुमार चांगलेच भडकेले.  “आम्ही आमच्या देशाला हिंदुस्थान म्हणतो. हिंदी ही आमची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा आपल्‍याला समजली पाहिजे.”, असे स्‍पष्‍ट करत नितीश कुमार यांनी मनोज झा यांना त्यांच्या भाषणाचा अनुवाद करु नये, असे स्‍पष्‍ट केले.
 
 
 
The post ‘तुम्‍हाला हिंदी भाषा समजली पाहिजे…’ : नितीश कुमार ‘द्रमुक’ नेत्‍यावर भडकले appeared first on Bharat Live News Media.

Go to Source