ठाण्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू
ठाणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएनवनचा नवीन व्हेरियंटचा रुग्ण दाखल झाला आहे. सदरचा रुग्ण १९ वर्षीय तरुणी असून तिला मंगळवारी (दि. १९) दुपारी साडेचार च्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
नवीन व्हेरियट पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळला असून यामुळे ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली आहे. जे एन वन हा ओ मायक्रॉनचा नवीन व्हेरियंट केरळमध्ये आढळला आहे. तीनशेहून अधिक जणांची आठवडाभरात केलेल्या तपासणीनंतर त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत या व्हेरियंटचे १३ रुग्ण असून राज्यात हा आकडा २४ वर गेला आहे.
ठाण्यातही या वेरियंट्सचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. ठाण्यात सध्या एकच रुग्ण आढळला असून पुन्हा एकदा ठाण्यात तपासणीला वेग येण्याची शक्यता आहे. या वृत्ताला कळवा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र भारूड यांनीही दुजोरा दिला आहे.
The post ठाण्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू appeared first on Bharat Live News Media.


Home ठळक बातम्या ठाण्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू
ठाण्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू
ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएनवनचा नवीन व्हेरियंटचा रुग्ण दाखल झाला आहे. सदरचा रुग्ण १९ वर्षीय तरुणी असून तिला मंगळवारी (दि. १९) दुपारी साडेचार च्या दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या तरुणीची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. नवीन व्हेरियट पहिलाच रुग्ण ठाण्यात आढळला …
The post ठाण्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण; कळवा रुग्णालयात उपचार सुरू appeared first on पुढारी.