अहमदनगर : निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा प्रकार; २९ जणांवर कारवाई
अकोले; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा आंदोलकांनी प्रयत्न करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी आज (दि. १९) अकोले पोलिसांत २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गाव शिवार ते खानापुर शिवारादरम्यान निळवडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधावर आज (दि.१९) सकाळी आंदोलक जमा झाले. व त्यांनी येथील ओढयाजवळ टिकाव खोऱ्याच्या सहाय्याने खोदण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर खानापुर गर्दणी डाव्या कालव्याच्या पुलावर बैठक मांडुन त्यांनी आंदोलन केले. खानापूर परिसरात कलम १४४ लागू असतानाही खानापूर येथे आदोलन करत आंदोलकांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. म्हणुन सुनिता अशोक भांगरे, मिनानाथ सखाराम पांडे, अमित अशोक भांगरे, सुरेश संपत गडाख, बाळासाहेब बाबुराव भांगरे, माधव राजाराम भांगरे, अनिकेत धर्मनाथ थिटमें, बबनराव पुंजाजी तिकांडे, रामहारी तिकांडे, कविता भांगरे, इंदुबाई शिवाजी थिटमे, अनुसयाबाई थिटमे, भाग्यश्री विजय आवारी, विनोद हांडे, विकास बंगाल, संत तिकांडे, महेश भानुदास तिकांडे, राजेंद्र कुमकर, राजेंद्र शेवाळे यासह २९ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा :
सांगली : पांढरेवाडीतील अवैध वाळू वाहतूक रोखल्याने पोलीस पाटीलला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
आई-बाबा जेव्हा ओझे होतात… तीन वर्षांत 102 वृद्धांची ‘भरोसा’कडे धाव
Nandurbar Police: मुलींची छेड काढणाऱ्या १७ टवाळखोरांना पोलिसांचा दणका
The post अहमदनगर : निळवंडे धरणाचा डावा कालवा फोडण्याचा प्रकार; २९ जणांवर कारवाई appeared first on Bharat Live News Media.