Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज ( दि. १९ डिसेंबर) १२ वा दिवस आहे. तत्पूर्वी खासदार निलंबनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय पक्षाची बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना विरोधी पक्षासंदर्भात महत्त्वाचा कानमंत्र दिला आहे. या सदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. (PM Modi advices BJP MPs)
संसद घुसखोरी प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विराेधी पक्षांच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठक घेतली. अधिवेशनाच्या १२ व्या दिवशी सत्र सुरू होण्यापूर्वी संसदेच्या ग्रंथालय भवनात भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिष्टाचार जपा” असा कानमंत्र यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भाजप खासदारांना दिला. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती हाेती. (PM Modi advices BJP MPs)
“विरोधी पक्ष सरकार उलथवून टाकण्याचा विचार करत आहेत. आम्ही एक राष्ट्र निर्माण करण्याचा विचार करत आहोत. टीकेला अशा भाषेत प्रत्युत्तर द्या, जी शिष्टाचार राखेल,” असे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सांगितले.
BJP Parliamentary Party meeting begins in the Parliament Library Building. Prime Minister Narendra Modi, Defence Minister Rajnath Singh and Party President J P Nadda are present in the meeting. https://t.co/2X46zSK1ZP
— ANI (@ANI) December 19, 2023
हेही वाचा:
Pope Francis | चर्चमध्ये आता समलैंगिक जोडप्यांना एन्ट्री, धर्मगुरू देणार आशीर्वाद, पोप फ्रान्सिस यांचा ऐतिहासिक निर्णय
BREAKING : ‘ज्ञानवापी-काशी’ प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘आव्हान’ याचिका फेटाळल्या
IPL Auction 2024 : ३३३ पैकी ७७ क्रिकेटपटू मारणार बाजी!, जाणून घ्या ‘आयपीएल’च्या लिलावाविषयी सविस्तर
The post PM मोदींचा भाजप खासदारांना कानमंत्र, “विरोधकांच्या टीकेला…” appeared first on Bharat Live News Media.