कंटेनरची मालवाहू गाडीला धडक, तीन जण ठार

जळगांव : पुढारी वृत्तसेवा – जामनेर तालुक्यातील टाकळी येथील नागदेवता जिनिंग प्रेस जवळ कंटेनर व मालवाहू गाडी यांच्या झालेल्या अपघातामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील पैठण येथे राहणारे तीन जण ठार झाले आहेत. रात्री उशिरा याप्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रमांक (आर जे 32 जीसी … The post कंटेनरची मालवाहू गाडीला धडक, तीन जण ठार appeared first on पुढारी.

कंटेनरची मालवाहू गाडीला धडक, तीन जण ठार

जळगांव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जामनेर तालुक्यातील टाकळी येथील नागदेवता जिनिंग प्रेस जवळ कंटेनर व मालवाहू गाडी यांच्या झालेल्या अपघातामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील पैठण येथे राहणारे तीन जण ठार झाले आहेत. रात्री उशिरा याप्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रमांक (आर जे 32 जीसी 0789) ने मालवाहू गाडी क्रमांक (एम एच २० डी इ 55 48) ला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की, यात तीघे जण ठार झाले आहे. अपघातानंतर पोलीस व रुग्णवाहिका यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात समीर नजीर शेख (20), अल्लाउद्दीन गयासुद्दीन शेख (40), साजन जगन बेंडाळे (26) वाहन चालक हे ठार झाले. याप्रकरणी जाबीर हुसेन पठाण, बालानगर तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसांत कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहे.
हेही वाचा :

‘रणांगणात प्रत्यक्षात उतरण्याची वेळ, ‘INDIA’ आघाडीला नवा समन्वयक नियंत्रक चेहरा हवाय’
लग्नात एकट्याने फस्त केले 150 रसगुल्ले!
रोहित शर्माला नेतृत्वावरून हटवल्याचे संतप्त पडसाद

The post कंटेनरची मालवाहू गाडीला धडक, तीन जण ठार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source