मनोज जरांगे पाटलांच राज ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर

मनोज जरांगे पाटलांच राज ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी मनोज जरांगे पाटील शड्डु ठोकुन उभे आहेत. ते आता महाराष्ट्र दौऱ्यावर असून मराठा समाजाला संबोधित करीत आहेत. या दरम्यान मराठा आरक्षणावरून राज्यात नेत्या-नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असताना त्यात आता राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे.
एकीकडे छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक रंगलेली दिसत असताना राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत काही व्यक्तव्ये केली आहेत. मनोज जरांगे मागील बोलवता धनी कोण? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोण जातीय तणाव निर्माण करतय? असे राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हटले.
या व्यक्तव्याचा समाचार घेतांना मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर देतांना म्हटले की जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण? हे देखील आता यांनी शोधून काढावं. सद्या मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर असून. ते आज पुणे जिल्यातील दौड गावाच्या दोऱ्यावर आहेत.
हेही वाचा

Jalgaon Crime : रखवालदाराचा खून करणारे दोघेही पोलिसांच्या जाळ्यात
एकत्र येण्याची आमच्या कुटुंबाची पद्धत : शरद पवार
दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

The post मनोज जरांगे पाटलांच राज ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मराठा समाजाला आरक्षण मिळाव यासाठी मनोज जरांगे पाटील शड्डु ठोकुन उभे आहेत. ते आता महाराष्ट्र दौऱ्यावर असून मराठा समाजाला संबोधित करीत आहेत. या दरम्यान मराठा आरक्षणावरून राज्यात नेत्या-नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असताना त्यात आता राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. एकीकडे छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक चकमक रंगलेली …

The post मनोज जरांगे पाटलांच राज ठाकरेंना जोरदार प्रतिउत्तर appeared first on पुढारी.

Go to Source