पुणे : अत्याचारित पीडितांना ‘आवाज’चा आधार

पुणे : शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असताना दुसरीकडे दबाव आणि मदतीअभावी पीडिता समोर येत नाहीत. त्यांच्या याच मानसिकतेत बदल करण्यासाठी, तसेच लैंगिक अत्याचारीत पीडितांच्या मदतीसाठी ‘आवाज’ पुढे सरसावला आहे. पुणे पोलिसांचा भरोसा सेल आणि सहेली एचआयव्ही एड्स कार्यकर्ता संघ या सामाजिक संस्थेकडून ‘आवाज’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यातून अनेक पीडितांना आत्मनिर्भर होण्यास … The post पुणे : अत्याचारित पीडितांना ‘आवाज’चा आधार appeared first on पुढारी.

पुणे : अत्याचारित पीडितांना ‘आवाज’चा आधार

पुणे : शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असताना दुसरीकडे दबाव आणि मदतीअभावी पीडिता समोर येत नाहीत. त्यांच्या याच मानसिकतेत बदल करण्यासाठी, तसेच लैंगिक अत्याचारीत पीडितांच्या मदतीसाठी ‘आवाज’ पुढे सरसावला आहे. पुणे पोलिसांचा भरोसा सेल आणि सहेली एचआयव्ही एड्स कार्यकर्ता संघ या सामाजिक संस्थेकडून ‘आवाज’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यातून अनेक पीडितांना आत्मनिर्भर होण्यास आणि जगण्याचा नवा विश्वास मिळण्यास मदत होत आहे.
छेडछाड, नकोसे लैंगिक संबंध, लैंगिक संबंधाची मागणी करणे, बलात्कार, प्रेमसंबंधातून घडलेले अत्याचार, शारीरिक व मानसिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीवरील अत्याचार, नको असलेली गर्भधारणा, कौमार्य चाचणी अशा विविध घटनांमध्ये महिला, अल्पवयीन मुलींचे आयुष्य पणाला लागते. त्यांच्या जीवनावर अशा घटनांचा दीर्घकालीन परिणाम घडून येतो. त्यातून सावरण्यासाठी त्यांना अनेक गोष्टींची गरज असते. कौटुंबिक आधाराबरोबरच एचआयव्ही एड्स कार्यकर्ता संघटना ‘आवाज’ प्रकल्प भरोसा सेलच्या मदतीने पीडितांना कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, भावनिक आधार व मानसिक समुपदेशन, पोलिस व कायदेशीर यंत्रणा यासंबंधी समन्वय अशा प्रकारचे काम करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे.
काय आहे प्रकल्प?
‘आवाज’ प्रकल्प मदत केंद्रामध्ये लैंगिक अत्याचार झालेल्या प्रौढ स्त्रिया व पारलिंगी व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. अशा व्यक्तींना अन्यायाविरुध्दचा लढा शेवटपर्यंत कसा लढावा, आयुष्यात पुन्हा कसे उभे राहण्यासाठी काय करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेलच्या मदतीने हा ‘आवाज’ प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
सहेली एचआयव्ही एड्स कार्यकर्ता संघ या सामाजिक संस्थेकडून भरोसा सेलतर्फे सहेली संघ, पुणे संचलित ‘आवाज’ प्रकल्प मदत केंद्र हे लैंगिक अत्याचार पीडितांना कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, भावनिक व मानसिक आधार मिळावा यासाठी स्थापन करण्यात आले आहे. नुकताच विलू पूनावाला यांच्या मदतीने ‘आवाज’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मोफत मार्गदर्शन, समुपदेशन तसेच खटला लढविण्यासाठी वकिलांची मदत मिळणार आहे.
– अनिता मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरोसा सेल.

हेही वाचा

Pune News : ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे 3 दिवस ‘काम बंद’ आंदोलन
नाशिकमध्ये धडकला बिऱ्हाड मोर्चा, शहर परिसरात सर्वत्र लालबावटा
Pune Crime News : तो आला पाहुणा म्हणून अन् गेला चोरी करून

The post पुणे : अत्याचारित पीडितांना ‘आवाज’चा आधार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source