…तर मी जिवंत समाधी घेईन : जरांगे-पाटील यांचे भुजबळांना आव्हान

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : जन्मापासून आतापर्यंत दारूचा थेंब जरी घेतला असला. किंवा माझ्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी तरी समाधी घ्यावी, मी नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे, असे आव्हान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले. Manoj Jarange-Patil … The post …तर मी जिवंत समाधी घेईन : जरांगे-पाटील यांचे भुजबळांना आव्हान appeared first on पुढारी.

…तर मी जिवंत समाधी घेईन : जरांगे-पाटील यांचे भुजबळांना आव्हान

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : जन्मापासून आतापर्यंत दारूचा थेंब जरी घेतला असला. किंवा माझ्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असेल तर मी जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी तरी समाधी घ्यावी, मी नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे, असे आव्हान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले. Manoj Jarange-Patil
दारू पिऊन पिऊन जरांगे- पाटील यांच्या किडन्या किडल्या असल्याची बोचरी टीका भुजबळ यांनी केली होती, या टीकेला अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. Manoj Jarange-Patil
ते पुढे म्हणाले की, भुजबळ यांचे ऐकून धनगर, वंजारी बांधवांनी आम्हाशी भांडू नये, आमची नाराजी अंगावर घेऊ नये. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे शरद पवारच कारणीभूत असल्याचा आरोप देवेंद्र फडणीस यांनी केला होता. यावर जरांगे पाटील म्हणाले की, आतापर्यंत आम्हाला आरक्षण न मिळण्यामागे सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते तितकेच जबाबदार आहेत. आतापर्यंत आम्ही त्यांना मोठे केले. परंतु, त्यांनी समाजासाठी काहीही केले नाही. मराठ्यांच्या आतापर्यंत ७२ लाख नोंदी सापडल्या आहेत. असा दावाही जरांगे यांनी यावेळी केला.
अंतरवाली सराटीतील उपोषण सोडताना मंत्रीमंडळाचे शिष्टमंडळ आणि कायदेतज्ञ यांनी आरक्षणासंर्भात लेखी घेतलेले मुद्दे, मिळालेल्या नोंदी आणि शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्यावर आरक्षण देण्यासंदर्भात कायदा पारित करून आरक्षण देणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पळून त्यावर प्रामाणिक राहतील, असा आम्हाला विश्वास आहे.
शिंदे समितीने आपले काम केले आहे. आता सरकारने आपले काम करावे, आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा पारीत करावा. आरक्षणाचा कायदा झाला तरी शिंदे समितीचे काम पुढे सुरू ठेवावे, अशी मागणी जरांगे -पाटील यांनी यावेळी केली.
हेही वाचा 

नांद् मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा ‘२४ डिसेंबर पर्यंत आरक्षण जाहीर करा अन्यथा…’

Winter Session Nagpur : धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस : मुख्यमंत्र्यांची घोषणा

Third Mumbai : राज्याला लवकरच मिळणार तिसरी मुंबई; अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह साकारणार हायटेक शहर

The post …तर मी जिवंत समाधी घेईन : जरांगे-पाटील यांचे भुजबळांना आव्हान appeared first on Bharat Live News Media.

Go to Source