गोवा: सचिव बैठकीला गैरहजर राहिल्याने बार्देश पंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
म्हापसा: Bharat Live News Media वृत्तसेवा : बैठकीची नोटीस काढूनही पंचायत सचिव बैठकीला हजर न राहिल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी वेर्ला – काणका, बार्देश पंचायतीला टाळे ठोकले. Goa News
याबाब अधिक माहिती अशी की, वेर्ला- काणका पंचायतीच्या सचिव निकिता परब यांनी आज (दि.१८) पंचायतीतील विविध समित्यांची बैठक बोलावली होती, तशी त्यांनी नोटीस काढली होती. त्याप्रमाणे या समित्यांचे पदाधिकारी, सदस्य व पंचायत मंडळ बैठकीसाठी पंचायतीच्या सभागृहात जमा झाले होते. परंतु दुपारचे बारा वाजले तरी पंचायत सचिव निकिता परब या पंचायत गृहात फिरकल्या नाहीत. सरपंच अनिता चारी यांनी पंचायत सचिव कार्यालयात गैरहजर असल्याची माहिती बार्देशचे गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास यांना दिल्यावर त्यांनी निकिता परब या रजेवर असल्याचे सांगितले. Goa News
त्या जर रजेवर गेल्या, तर त्या जागी दुसऱ्या पंचायत सचिवांना या बैठकीसाठी पाठवणे गरजेचे असताना कोणीही न आल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पंचायतीला टाळे ठोकण्याचा पवित्रा घेतला.
दरम्यान, पंचायतीच्या सचिवांनी पंचायत मंडळास विश्वासात न घेता परस्पर एक ना हरकत दाखला दिला आहे. या कारणाने पंचायतीने त्यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. परंतु पंचायतीला अद्याप कळवण्यात आलेले नाही, असे सरपंच चारी यांनी सांगितले. जर त्यांची बदली झाली असेल, तर दुसऱ्या पंचायत सचिवांची नियुक्ती व्हायला हवी होती, तसेही झाले नाही आणि या पंचायत सचिव गैरहजर राहतात. त्यामुळे पंचायतीची कामे खोळंबली असल्याचे सरपंचांनी सांगितले.
हेही वाचा
गोवा : आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या ताफ्यातील वाहनाला बसची धडक
गोवा : मोरजी येथे १ कोटी ७५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त: रशियन नागरिकाला अटक
सिंधुदुर्ग ; मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक, एक जखमी
The post गोवा: सचिव बैठकीला गैरहजर राहिल्याने बार्देश पंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे appeared first on Bharat Live News Media.