‘मराठा आरक्षणाला विरोध शरद पवारांचाच’

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाला शरद पवार यांचाच विरोध होता. त्यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. परंतु, त्यांना कधीच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. त्यांना दोन समाजांना केवळ झुंजवत ठेवायचे होते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. जिल्ह्यातील कोराडी येथे भाजपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात फडणवीस … The post ‘मराठा आरक्षणाला विरोध शरद पवारांचाच’ appeared first on पुढारी.
‘मराठा आरक्षणाला विरोध शरद पवारांचाच’


नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आरक्षणाला शरद पवार यांचाच विरोध होता. त्यांच्या मनात असते तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. परंतु, त्यांना कधीच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते. त्यांना दोन समाजांना केवळ झुंजवत ठेवायचे होते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला.
जिल्ह्यातील कोराडी येथे भाजपच्या प्रदेश पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का, असे वक्तव्य खा. सुप्रिया सुळे यांनी केले होते, असे सांगून फडणवीस म्हणाले, आता त्याच मराठा आरक्षणावर बोलत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्रात आमचे सरकर होते, त्यावेळी आपण मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते सर्वोच्च न्यायालयात आपल्या सरकारच्या काळात टिकवले गेले होते. आत्ताही आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र, हे आरक्षण देताना ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, हे भाजपचे स्पष्ट आश्वासन असल्याचे फडणवीस ठासून म्हणाले.
विरोधी पक्षांना देशाची, समाजाची चिंता नाही; तर त्यांना त्यांच्या परिवाराची चिंता आहे. ते रोज भूमिका बदलतात. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना फक्त सत्तेच्या राजकारणात आपलेच अस्तित्व टिकवण्याची चिंता असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
लोकांना मोदी हवेत; पण गाफील राहू नका : फडणवीस
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयाचा आनंद नक्कीच आहे. मात्र येणार्‍या लोकसभा निवडणुकीचे अव्हान आपल्यासमोर आहे. उगाच गाफील राहू नका, असे आवाहनही फडणवीस यांनी केले. देशाची सूत्रे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात द्यायचे लोकांनी ठरविले आहे. मात्र, मोदींचे नाव आहे म्हणून अतिआत्मविश्वासात गाफील राहू नका.
The post ‘मराठा आरक्षणाला विरोध शरद पवारांचाच’ appeared first on Bharat Live News Media.

Go to Source