१६ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या होऊ शकते कमी! ‘ही’ आहेत कारणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पीएम किसान योजनेचे १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. १६ व्या हप्त्याची (PM Kisan Yojana 16th Installment) नोंदणीही सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेसाठी नोंदणी केलेली नाही ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइट (pmkisan.gov.in) वर जाऊन नोंदणी करू शकतात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना … The post १६ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या होऊ शकते कमी! ‘ही’ आहेत कारणे appeared first on पुढारी.
१६ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या होऊ शकते कमी! ‘ही’ आहेत कारणे


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पीएम किसान योजनेचे १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. १६ व्या हप्त्याची (PM Kisan Yojana 16th Installment) नोंदणीही सुरू झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेसाठी नोंदणी केलेली नाही ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइट (pmkisan.gov.in) वर जाऊन नोंदणी करू शकतात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम ४ महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी २ हजार रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. १५ व्या हप्त्यादरम्यान शेतकर्‍यांच्या खात्यावर अंदाजे ८ कोटी रुपये पाठवण्यात आले. पुढील हप्त्यादरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ शकते.
…तर तुमचेही नाव यादीतून वगळले जाईल
गेल्या अनेक हप्त्यांमध्ये जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीदरम्यान, लाभार्थ्यांच्या हप्त्यांमधून मोठ्या प्रमाणात लोकांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत यावेळीही ही परिस्थिती उद्भवू शकते. याशिवाय, ई-केवायसी न केल्याने, तुम्ही लाभार्थी यादीतूनही बाहेर जाऊ शकता.
अर्ज स्थितीत केलेल्या चुका पडतील महागात
तुम्हाला पीएम किसानचे पुढील हप्ते मिळवायचे असतील, तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्‍ही अद्याप केवायसी केली नसेल, तर ती लवकर करा. शेतकरी त्यांच्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी करू शकतात. तुम्ही तसे न केल्यास, तुम्हाला पुढील हप्त्यांपासून वंचित राहावे लागू शकते. याशिवाय अर्जाच्या स्थितीत झालेल्या चुका तुम्हाला लाभार्थी यादीतून बाहेर काढू शकतात.
शेतकरी येथे संपर्क करू शकतात
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर – १५५२६१ किंवा १८००११५५२६ (टोल फ्री) किंवा ०११-२३३८१०९२ वर संपर्क साधू शकता.
हेही वाचा : 

PM मोदींना प्रश्न विचारण्याची सुवर्णसंधी; ‘परीक्षा पे चर्चा-2024’ साठी नाव नोंदणी सुरू
‘भारत- ओमान’चे द्वीपक्षीय संबंध आणखी मजबूत; जाणून घ्या त्याविषयी
बेरोजगारी, महागाईमुळे ‘त्या’ तरुणांनी संसदेची सुरक्षा भेदली : राहुल गांधी

The post १६ व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या होऊ शकते कमी! ‘ही’ आहेत कारणे appeared first on Bharat Live News Media.

Go to Source