इस्रायलच्या हल्ल्यात गाझात 10 मिनिटाला एका मुलाचा मृत्यू
तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायल-‘हमास’ युद्धात पॅलेस्टाईनमधील 11 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यात सरासरी दहा मिनिटांमागे एका मुलाचा मृत्यू होत असल्याचे पुढे आले आहे.
पॅलेस्टाईनमधील निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्यामुळे शस्त्रसंधीबाबत इस्रायलवर अमेरिका, भारत, फ्रान्ससह जगातील अन्य देशांकडून दबाव वाढत आहे. इस्रायली हल्ल्यात दहा मिनिटांमागे गाझापट्टीतील एका मुलाचा मृत्यू होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. इस्रायलकडून हवाई हल्ले सुरूच असून, रुग्णालयातील मृतांच्या आकडेवारीच्या आधारे आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे.
‘हमास’च्या दहशतवाद्यांना नायनाट करेपर्यंत युद्ध सुरू ठेवण्याचा निर्धार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे इस्रायलवर युद्धबंदी करण्याबाबतचा दबाव वाढत आहे. या युद्धात पॅलेस्टाईनमधील नागरिकांचा बळी जात असल्याने शस्त्रसंधी करण्याची मागणी अमेरिका, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी नेतान्याहू यांच्याकडे केली आहे.
The post इस्रायलच्या हल्ल्यात गाझात 10 मिनिटाला एका मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.
तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायल-‘हमास’ युद्धात पॅलेस्टाईनमधील 11 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यात सरासरी दहा मिनिटांमागे एका मुलाचा मृत्यू होत असल्याचे पुढे आले आहे. पॅलेस्टाईनमधील निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्यामुळे शस्त्रसंधीबाबत इस्रायलवर अमेरिका, भारत, फ्रान्ससह जगातील अन्य देशांकडून दबाव वाढत आहे. इस्रायली हल्ल्यात दहा मिनिटांमागे गाझापट्टीतील एका मुलाचा मृत्यू …
The post इस्रायलच्या हल्ल्यात गाझात 10 मिनिटाला एका मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.