Fraud News : पावणेसहा कोटींच्या अपहाराच्या गुन्ह्यात सीएसह दोघांना अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहर सहकारी बँकेच्या 5 कोटी 75 लाख रुपयांच्या अपहाराच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने सीए विजय मर्दा यांच्यासह दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सीए विजय विष्णुप्रसाद मर्दा (वय 57, रा. 144, रिद्धी-सिद्धी कॉलनी, नगर), जगदीश बजाराम कदम (वय 50, डीलर, रा. समर्थनगर, नवी सांगवी, पुणे) … The post Fraud News : पावणेसहा कोटींच्या अपहाराच्या गुन्ह्यात सीएसह दोघांना अटक appeared first on पुढारी.

Fraud News : पावणेसहा कोटींच्या अपहाराच्या गुन्ह्यात सीएसह दोघांना अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहर सहकारी बँकेच्या 5 कोटी 75 लाख रुपयांच्या अपहाराच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने सीए विजय मर्दा यांच्यासह दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सीए विजय विष्णुप्रसाद मर्दा (वय 57, रा. 144, रिद्धी-सिद्धी कॉलनी, नगर), जगदीश बजाराम कदम (वय 50, डीलर, रा. समर्थनगर, नवी सांगवी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 17 फेब्रुवारी 2014 रोजी व त्यानंतरच्या काळात आरोपी डॉ. नीलेश शेळके याने फिर्यादी डॉ. रोहिणी सिनारे (रा. राहुरी) व अन्य साक्षीदारांना विश्वासात घेऊन ‘एआयएमएस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ उभारून त्यात त्यांना भागीदार करून घेतले. त्यानंतर अहमदनगर शहर सहकारी बँकेचे संचालक मंडळ, बँक अधिकारी व कर्मचारी, सीए विजय मर्दा, वैद्यकीय मशिनरी वितरक
यांच्याशी संगनमत करून आरोपी डॉ. शेळके याने फिर्यादीस अहमदनगर शहर सहकारी बँकेतून 5 कोटी 75 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडले.
त्यासाठी बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून बँक नियमावलीप्रमाणे अटी व शर्तींची पूर्तता झालेली नसतानाही, ते कर्ज मंजूर करून घेऊन फिर्यादीच्या संमतीशिवाय परस्पर वितरकाच्या नावे वर्ग केले. त्यानंतर ती कर्ज रक्कम फिर्यादीच्या नावे असलेल्या बनावट बँक खात्यात वितरकांना परत करण्यास सांगितली. ती रक्कम नंतर वेळोवेळी आरोपी डॉ. शेळके याने त्याच्या व इतर भागीदारांच्या संयुक्त खात्यात वळवली आणि काढून अपहार केला.
या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वैद्यकीय साहित्य पुरवठादार जगदीश कदम, आरोपी व फिर्यादी यांचा सीए विजय मर्दा यांना अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने दोन्ही आरोपींना आज न्यायालयाने त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण करीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सात जणांना अटक केली असून, त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे.
हेही वाचा :

इकडे लक्ष द्या ! पास नसेल तर शिर्डीतील मंदिरात मिळणार नाही प्रवेश
Oman Sultan Visit to India: ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आजपासून भारत दौऱ्यावर; पीएम मोदींची घेणार भेट

The post Fraud News : पावणेसहा कोटींच्या अपहाराच्या गुन्ह्यात सीएसह दोघांना अटक appeared first on पुढारी.

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहर सहकारी बँकेच्या 5 कोटी 75 लाख रुपयांच्या अपहाराच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने सीए विजय मर्दा यांच्यासह दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सीए विजय विष्णुप्रसाद मर्दा (वय 57, रा. 144, रिद्धी-सिद्धी कॉलनी, नगर), जगदीश बजाराम कदम (वय 50, डीलर, रा. समर्थनगर, नवी सांगवी, पुणे) …

The post Fraud News : पावणेसहा कोटींच्या अपहाराच्या गुन्ह्यात सीएसह दोघांना अटक appeared first on पुढारी.

Go to Source