Crime News : महिलेवर लैंगिक अत्याचार; फोटो, व्हिडिओ केले व्हायरल
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर जवळीक साधून महिलेवर बलात्कार केल्यानंतर, अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, खडकी पोलिसांनी ऋषीकेश रोहिदास पवार (रा.इंद्रायणीनगर, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत औंध बोपोडी परिसरातील 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना जून 2023 मध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी ऋषीकेश या दोघांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली.
त्यानंतर त्याने फिर्यादी महिलेशी जवळीक वाढवून त्यांच्या ओळख करून घेतली. पुढे त्याने फिर्यादी महिलेच्या घरी-जाणे येणे सुरू केले. एकेदिवशी फिर्यादी ह्या आरोपीला चहा देत असताना त्याने त्यांच्यावर बलात्कार केला तसेच त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ऋषीकेश पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.
हेही वाचा
पुणेकर म्हणतात.. पुण्यात डबलडेकर बस नकोच
समाजभान : उपचारमहागाईची चिंता
आता तुमचे परदेशी शिकण्याचे स्वप्न होणार पूर्ण
The post Crime News : महिलेवर लैंगिक अत्याचार; फोटो, व्हिडिओ केले व्हायरल appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर जवळीक साधून महिलेवर बलात्कार केल्यानंतर, अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, खडकी पोलिसांनी ऋषीकेश रोहिदास पवार (रा.इंद्रायणीनगर, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत औंध बोपोडी परिसरातील 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना जून 2023 मध्ये घडली. पोलिसांनी …
The post Crime News : महिलेवर लैंगिक अत्याचार; फोटो, व्हिडिओ केले व्हायरल appeared first on पुढारी.