मराठा आंदोलकांच्या चप्पलफेकीनंतर पडळकर म्हणाले, “या नौटंकीबाजांनी”

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदापूर येथे काल ओबीसी एल्‍गार मेळाव्‍याचे आयाेजन केले हाेते. येथील सभा झाल्‍यानंतर भाजप नेते  गाेपीचंद पडळकर यांच्या त्यांच्या दिशेने शनिवारी (दि.९) चप्पलफेकीचा प्रकार घडला. अण्‍णा काटे यांच्‍या उपोषणस्‍थळी जात असताना  हा प्रकार घडला आहे. यानंतर पडळकर यांनी एक व्हिडिओसह पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले … The post मराठा आंदोलकांच्या चप्पलफेकीनंतर पडळकर म्हणाले, “या नौटंकीबाजांनी” appeared first on पुढारी.
#image_title
मराठा आंदोलकांच्या चप्पलफेकीनंतर पडळकर म्हणाले, “या नौटंकीबाजांनी”


पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदापूर येथे काल ओबीसी एल्‍गार मेळाव्‍याचे आयाेजन केले हाेते. येथील सभा झाल्‍यानंतर भाजप नेते  गाेपीचंद पडळकर यांच्या त्यांच्या दिशेने शनिवारी (दि.९) चप्पलफेकीचा प्रकार घडला. अण्‍णा काटे यांच्‍या उपोषणस्‍थळी जात असताना  हा प्रकार घडला आहे. यानंतर पडळकर यांनी एक व्हिडिओसह पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते” (Gopichand Padalkar News
Gopichand Padalkar News : …या नौटंकीबाजांनी
गाेपीचंद पडळकर यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर शनिवारी (दि.९) झालेल्या चप्पलफेकी प्रकरणाबाबत पोस्ट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,“इंदापूरच्या सभेनंतर दूधदर आंदोलनास जाताना हा भेकड प्रकार घडला. परत या नौटंकीबाजांनी हे माझ्याच कार्यकर्त्यांनी केलं असे सांगितले. मी संयमाची भूमिका घेतली अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते. ओबीसी बांधवांनो याचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. यळकोट यळकोट जय मल्हार. “
यामागचा मुख्य सुत्रधार….
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पडळकर म्हणत आहे की, “ओबीसी समाज अत्यंत सयंमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामंध्ये आपली स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला आणि नंतर या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मीडियात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते. मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेल्या समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे.

यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहितेय कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. कारण आपल्याला डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा. जय क्रांतीज्योती, जय भीम,जय मल्हार.
 

Gopichand Padalkar : काय आहे प्रकरण
ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत इंदापुरात शनिवारी (दि.९) ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रासप नेते महादेव जानकर व त्यांच्यासह राज्यभरातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. मेळावा संपल्यानंतर पडळकर इंदापुरातील एका आंदोलन स्थळी भेट देण्यास गेले होते. शेजारीच मराठा बांधवांकडून साखळी उपोषण सुरू होते. त्याचदरम्यान मराठा बांधवाकडून त्यांना जाब विचारत घोषणाबाजी सुरु झाली आणि त्यांच्या दिशेने चप्पल फेकण्यात आली.
जशास तसे उत्तर देऊ!
ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत पडळकरांवर झालेल्या चप्पलफेकीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, विरोध आहे तो झुंडशाहीला व दादागिरीला! आज विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यावर काही समाजकंटक लोकांनी विकृती दाखवून व लोकशाही पायदळी तुडवून हल्ला केल्याची बातमी समजली! या घटनेचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो! मी आजही इंदापूर येथे जाहीर सभेत सांगितल आहे की ही दादागिरी थांबली नाही तर याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ!”

इंदापूरच्या सभेनंतर दूधदर आंदोलनास जाताना हा भेकड प्रकार घडला.परत या नौटंकीबाजांनी हे माझ्याच कार्यकर्त्यांनी केलं असे सांगितले.मी संयमाची भूमिका घेतली अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले नसते.#OBC बांधवांनो याचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये.
यळकोट यळकोट जय मल्हार. pic.twitter.com/x6XgV9hX6n
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 10, 2023

हेही वाचा 

Gopichand Padalkar News : हे गणराया, गोपिचंद पडळकर यांना सद्बुद्धी दे..!
Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक, इंदापूर येथील प्रकार
शिंदेंनी मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला
Tripti Dimri : इंटिमेट सीन करताना सेट बंद झाला अन्…तृप्ती डिमरीने सांगितला बोल्ड सीनचा ‘तो’ किस्सा

The post मराठा आंदोलकांच्या चप्पलफेकीनंतर पडळकर म्हणाले, “या नौटंकीबाजांनी” appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंदापूर येथे काल ओबीसी एल्‍गार मेळाव्‍याचे आयाेजन केले हाेते. येथील सभा झाल्‍यानंतर भाजप नेते  गाेपीचंद पडळकर यांच्या त्यांच्या दिशेने शनिवारी (दि.९) चप्पलफेकीचा प्रकार घडला. अण्‍णा काटे यांच्‍या उपोषणस्‍थळी जात असताना  हा प्रकार घडला आहे. यानंतर पडळकर यांनी एक व्हिडिओसह पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अन्यथा भेकडांच्या अंगावर कपडेही राहिले …

The post मराठा आंदोलकांच्या चप्पलफेकीनंतर पडळकर म्हणाले, “या नौटंकीबाजांनी” appeared first on पुढारी.

Go to Source