‘हा’ मॅच फिक्सर बनला पाकिस्तानचा सिलेक्टर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Salman Butt PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) फिक्सिंग प्रकरणात 5 वर्षांच्या बंदीचा सामना करणारा माजी कर्णधार सलमान बट याला राष्ट्रीय निवड समितीमध्ये स्थान दिले आहे. त्याची मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बट व्यतिरिक्त कामरान अकमल आणि राव इफ्तिखार अंजुम यांनाही मुख्य निवडकर्त्याचे सल्लागार म्हणून नेमण्यात … The post ‘हा’ मॅच फिक्सर बनला पाकिस्तानचा सिलेक्टर! appeared first on पुढारी.
#image_title

‘हा’ मॅच फिक्सर बनला पाकिस्तानचा सिलेक्टर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Salman Butt PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) फिक्सिंग प्रकरणात 5 वर्षांच्या बंदीचा सामना करणारा माजी कर्णधार सलमान बट याला राष्ट्रीय निवड समितीमध्ये स्थान दिले आहे. त्याची मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बट व्यतिरिक्त कामरान अकमल आणि राव इफ्तिखार अंजुम यांनाही मुख्य निवडकर्त्याचे सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे.

Team India South Africa Tour : टीम इंडियाची घोषणा, द. आफ्रिका दौर्‍यातील तीन मालिकांसाठी तीन कर्णधार
Rahane-Pujara Career Over : रहाणे-पुजाराच्या कारकिर्दीचा शेवट! सूर्यालाही ‘वॉर्निंग’

भारतात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची अत्यंत खराब कामगिरी झाली. त्यांना विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत देखील मजल मारता आली नाही. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. प्रथम बाबर आझमने सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले, त्यानंतर नवीन कर्णधार निवडण्यात आले. शान मसूदकडे कसोटी संघाचे कर्णधारपद तर शाहीन शाह आफ्रिदीकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. त्याचबरोबर मोहम्मद हाफीजला क्रिकेट संचालक बनवण्यात आले. तर उमर गुलला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक आणि सईद अजमलला फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली. यासह पीसीबीने आता आपल्या निवड समितीमध्ये स्पॉट फिक्सिंगमुळे बंदीचा सामना करावा लागलेल्या सलमान बटचा समावेश केला आहे. या निवडीनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. (Salman Butt PCB Selection Panel)
पीसीबीच्या निर्णयावर चाहते नाराज (Salman Butt PCB Selection Panel)
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयामुळे चाहते खूपच निराश झाले आहेत. देशाच्या सन्मानाला कलंक लावणाऱ्या व्यक्तीने संघ निवडक व्हावे ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. काही युजर्सनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. काहींनी हा अत्यंत खराब निर्णय असल्याचे म्हणत पीसीबीला हे करण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे होती, असा टोला हाणला आहे. तर काहींनी म्हटले आहे की, बट आता इतर खेळाडूंनाही मॅच फिक्सिंग कसे करायचे याचे धडे शिकवेल.’
2010 मध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी सलमान बटवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर त्याने 2016 मध्ये क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. देशांतर्गत स्पर्धांमध्ये तो बऱ्यापैकी यशस्वी झाला पण राष्ट्रीय संघाचे दार त्याला बंदच राहिले. (Salman Butt PCB Selection Panel)

Shame on PCB for appointing a spot fixer Salman Butt in selection panel. @TheRealPCB @TheRealPCBMedia @ICC https://t.co/f3pYFgDI6U pic.twitter.com/LscWBoRH2T
— Syed Taqi Abbas (@syedmtaqi_) December 1, 2023

The post ‘हा’ मॅच फिक्सर बनला पाकिस्तानचा सिलेक्टर! appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Salman Butt PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) फिक्सिंग प्रकरणात 5 वर्षांच्या बंदीचा सामना करणारा माजी कर्णधार सलमान बट याला राष्ट्रीय निवड समितीमध्ये स्थान दिले आहे. त्याची मुख्य निवडकर्ता वहाब रियाझ यांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बट व्यतिरिक्त कामरान अकमल आणि राव इफ्तिखार अंजुम यांनाही मुख्य निवडकर्त्याचे सल्लागार म्हणून नेमण्यात …

The post ‘हा’ मॅच फिक्सर बनला पाकिस्तानचा सिलेक्टर! appeared first on पुढारी.

Go to Source