अकोलेतील तरूणाईला जडले जुगाराचे व्यसन

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  अवैध धंद्यांना चाप लावून कायदा सुव्यवस्था टिकवणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य, मात्र अकोले तालुक्यात अवैध व्यवसायावर वचक कमी झाल्याने गल्लीबोळात हे व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे तरूणाचे याकडे आकर्षिला त्यांच्या मायाजालात सापडलेला आहे. मटका, जुगार याकडे होणारे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शाहुनगर, कोतूळ, विरगाव फाटा, देवठाण परिसरात अवैध धंदे फोफावले आहे. परिणामी … The post अकोलेतील तरूणाईला जडले जुगाराचे व्यसन appeared first on पुढारी.
#image_title

अकोलेतील तरूणाईला जडले जुगाराचे व्यसन

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  अवैध धंद्यांना चाप लावून कायदा सुव्यवस्था टिकवणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य, मात्र अकोले तालुक्यात अवैध व्यवसायावर वचक कमी झाल्याने गल्लीबोळात हे व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे तरूणाचे याकडे आकर्षिला त्यांच्या मायाजालात सापडलेला आहे. मटका, जुगार याकडे होणारे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शाहुनगर, कोतूळ, विरगाव फाटा, देवठाण परिसरात अवैध धंदे फोफावले आहे. परिणामी परिसरात कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने तरुणाई आकर्षित होताना दिसत आहे. चार महिन्यांपुर्वी अकोले पोलिस ठाण्याचा पदभार पो. नि. विजय करे यांनी हाती घेतल्यानंतर अकोले शहरासह तालुक्यातील मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, चक्री, व्हीडीओ गेम, गावठी दारू इत्यादी अवैध धंद्यावर छापे मारी (धाडसत्र) सुरु केले.
संबंधित बातम्या :

गावरानपेक्षा लाल कांदाच खातोय भाव ! 
Ajit Pawar : आम्हाला कायम गाफील का ठेवले ? : अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
क्रूर बाप ! जेवणात चिकन नसल्याने पोटच्या मुलीच्या डोक्यात घातली वीट 

अवैध धंदे चालविणारे यांच्यासह तेथे, खेळणार्‍या जुगार्‍यांना देखील त्यांनी सळो की पळो करून सोडल्याने अवैध व्यवसाय करणार्‍यांनी पो. नि. करे यांचा चांगलाच धसका घेतला होता. परंतु आजमितिस अकोले शहरात सर्व मटके, पत्ते जुगार, ऑनलाईन लॉटरी, चक्री इत्यादी अवैध धंदे सुरु असल्याचे दिसून येत आहेत. कोल्हार- घोटी राज्यमार्गावरील अकोले- राजूर रस्त्यावर शाहुनगर तसेच कोतुळ,विरगाव फाटा, देवठाण परिसरात जुगार, मटका आजही राजरोस पणे चालू आहे. या मटक्यामध्ये तरुण पिढी मोठ्या प्रमाणात अडकत चालली आहे. अनेकांचे संसार मटक्यामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. दोन महिन्यांपुर्वी अकोले पोलिसांनी तालुक्यात व शहरात अनेक ठिकाणी छापे मारले. तर ज्या- ज्या ठिकाणी छापे मारून कारवाई केली. त्याच ठिकाणी मटका पुन्हा सुरुच असल्याचे दिसते. त्यामुळे पोलिसांची कारवाई एक प्रकारे फार्सच असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध मटका व जुगार प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी नागरीकांमधून जोर धरू लागली आहे.
मटका व जुगार या व्यवसायाला शासनाची परवानगी असल्याप्रमाणे हा मटका उघडपणे खेळला जातो. या व्यवसायात मोठे कमिशन भेटत असल्यामुळे धंदा घेण्यासाठी एजंटांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कधीतरी पोलिसांची कारवाई झालीच, तर एजंटला सोडून आणण्याची जबाबदारी ही बुकीची असते. पोलिस मटका, जुगार खेळणार्‍यांवर आणि मटका एजंटांवर जुजबी कारवाई नाममात्र करतात. मात्र मटका चालणार्‍या टपरी, जागामालकावर गुन्हा दाखल करत नाही. त्यामुळे तरुण मुलांना हा धंदा करण्यात पोलिसांची कसलीच भीती राहिलेली नाही. तसेच अनेक छोटे-मोठे हॉटेल्स, टपर्‍यांमधून हा खेळ चालवला जातो.
अकोले तालुक्यात मटका, जुगार खेळणार्‍या व अवैध दारु विकणार्‍या 48 जणावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांना अटक करता येत नसल्याने मटका, जुगार खेळणारे जामीन घेतात. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर अवैध दारुबंदी व मटका, जुगार चालवणार्‍यांचे रेशन, लाईट, नळ यांचा पुरवठा गोठावण्यात यावा असा ठराव घेण्यात यावा. किंवा शासनाच्या योजनाचा लाभ देऊ नये, म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
                                                 स. पो. नि. विजय करे, अकोले पोलिस ठाणे.
The post अकोलेतील तरूणाईला जडले जुगाराचे व्यसन appeared first on पुढारी.

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  अवैध धंद्यांना चाप लावून कायदा सुव्यवस्था टिकवणे हे पोलिसांचे आद्य कर्तव्य, मात्र अकोले तालुक्यात अवैध व्यवसायावर वचक कमी झाल्याने गल्लीबोळात हे व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे तरूणाचे याकडे आकर्षिला त्यांच्या मायाजालात सापडलेला आहे. मटका, जुगार याकडे होणारे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शाहुनगर, कोतूळ, विरगाव फाटा, देवठाण परिसरात अवैध धंदे फोफावले आहे. परिणामी …

The post अकोलेतील तरूणाईला जडले जुगाराचे व्यसन appeared first on पुढारी.

Go to Source