‘शिक्षक’ निवडणूक दौरा, प्रचार, आरोप अन् प्रलोभनांची सरबराई

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून आज किशोर दराडे यांच्या उत्तर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. …
‘शिक्षक’ निवडणूक दौरा, प्रचार, आरोप अन् प्रलोभनांची सरबराई

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – लोकसभेनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून आज किशोर दराडे यांच्या उत्तर महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार (दि.२२) रोजी जळगाव शहरात दाखल झाले होते.
जळगाव विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघ प्रचारासाठी शैक्षणिक संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव येथे आगमन झाले. त्यानुसार आदित्य लॉन्सवर बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
मतदारांना ड्रेस, पैठणी व नथ
दरम्यान, नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शनिवार (दि.२२) रोजी मतदारांना प्रलोभन देण्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून आले. निवडणूक रिंगणात असलेले आपल्यालाच पसंतीचे वोट मिळावे म्हणून मतदारांना पैठणी, सोन्याची नथ व झकपक ड्रेस असे मतदारांच्या घरी पोहोचण्यात आलेले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातून १३ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांनी आपल्या बाजूने मतदान करण्यासाठी रिंगणात असलेले उमेदवार आपापल्या परीने मतदारांना प्रलोभन देण्याचे काम करीत आहेत. यातच एका मतदाराने ड्रेस, पैठणी व नथ वाटप करण्यात आले असून मतदारांच्या घरी देखील ते पोहोचलेले आहेत तर संचालकांनाही पाकिटे पाठवण्यात आले असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
https://x.com/andharesushama/status/1804562178294604138?t=fJdYmd5bWLJvM7YKIS3OYg&s=19
आदित्य लॉन्सवर सभा भरली असतांना चक्क किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला. किमान सहा शिक्षक ज्यांनी आणलेले आहेत. किंवा सहा शिक्षकांची जी शाळत्त आहे असे संस्थाचालक किंवा मुख्याध्यापक यांना सरळ सरळ पैसे वाटपाचा कार्यक्रम झाला. सुषमा अंधारे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये एक भिरुड नावाची व्यक्तीला शिक्षणक्षेत्रात कोणी ओळखत नाही असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैशाचे वाटप
लोकसभेच्या निकालाने भाजप विधानसभेसाठी सतर्क