उरीमध्ये भारतीय लष्कराची कारवाई, २ दशतवाद्यांचा खात्मा

पुढारी ऑनलाईन डेस्क: उरी सेक्टरमध्ये (जम्मू-काश्मीर) सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. आजच्या (दि.२३ जून) कारवाईत आणखी एका दशतवादाचा खात्मा (J&K Encounter) केला. दहशतवादविरोधी कारवाई सुरूच असल्याचेही भारतीय लष्कराने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) शनिवारी …

उरीमध्ये भारतीय लष्कराची कारवाई, २ दशतवाद्यांचा खात्मा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: उरी सेक्टरमध्ये (जम्मू-काश्मीर) सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत भारतीय लष्कराला यश मिळाले आहे. आजच्या (दि.२३ जून) कारवाईत आणखी एका दशतवादाचा खात्मा (J&K Encounter) केला. दहशतवादविरोधी कारवाई सुरूच असल्याचेही भारतीय लष्कराने म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
विशिष्ट गुप्तचर माहितीच्या आधारे, जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) शनिवारी (२२ जून) सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी मोहिमेत किमान दोन दहशतवादी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणी एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील गोहल्लान भागात भारतीय लष्कर आणि संयुक्त सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला (J&K Encounter) असल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

Based on specific intelligence inputs, an anti infiltration Operation was launched in the Uri Sector. Contact was established with infiltrating terrorists and Operations are in progress: Indian Army pic.twitter.com/m1rwd9Vnhg
— ANI (@ANI) June 22, 2024

यापूर्वी, 19 जून रोजी बारामुल्लाच्या वाटरगाम भागात बुधवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. अधिका-यांनी सांगितले की, बारामुल्लाच्या वॉटरगाम भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून सैन्याने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू (J&K Encounter) केली.