एल्विश यादव-अभिषेक मल्हनमध्ये बाचाबाची; निश्यच राववर..

एल्विश यादव-अभिषेक मल्हनमध्ये बाचाबाची; निश्यच राववर..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘बिग बॉस ओटीटी सीजन ३’ सुरू झाले आहे. पण सीजन २ ला सुरु झालेला वाद आजदेखील शांत झालेला नाही. एल्विश यादव आणि अभिषेक मल्हन यांचा शो संपल्यानंतर सोशल मीडियावर जेदेखील उत्तर-प्रत्युत्तर देण्यात आले, ते आजदेखील सुरु आहे. आता एल्विश यादवचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अभिषेकला त्याचा भाऊ निश्चय मल्हन विषयी असं काही म्हटलं की, त्यास सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.
अधिक वाचा –

मनोरंजन : हॉरर कॉमेडीचा सुपरहिट मंत्र!

एल्विश यादवची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये तो म्हणताना दिसत आहे की, ‘मला असं वाटतं की, दुसरा स्पर्धक असायला हवा आमचा निश्चय भाऊ. कारण, मल्हन फॅमिलीतून कुणीतरी एक व्यक्ती प्रत्येक वर्षी बिग बॉसमध्ये जायला हवा…रनर-अप पोझिशनसाठी यार. कुणीतरी असेल ना! अभिषेक भाऊ?’ यावर अभिषेक मल्हनने राव साहबला सडेतोड उत्तर दिलं आहे.
अधिक वाचा –

सोनाक्षीच्या घरी लग्नाची जय्यत तयारी; घरदार उजळले; मेहंदी फोटो व्हायरल

एल्विश यादवला सडेतोड उत्तर
अभिषेकने एल्विशच्या व्हिडिओवर रिप्लाय केला होता. त्याने लिहिलं, ‘अरे भाऊ निश्चय, सरकारकडून पुरस्कार जिंकला होता. तुम्हाला सरकारकडून काय मिळालं होतं?’ सोबतचं एक स्माईल इमोजी आणि एक फटाका इमोजी शेअर केली आहे. काही न बोलता, एल्विशच्या तुरुंगात जाण्याच्या प्रकरणाचा उल्लेख केला आणि त्यांना सडेतोड उत्तर दिलं. यावर एल्विशने पुन्हा प्रतिक्रिया दिली आणि संताप व्य्क्त केला.

स्वप्नील जोशीचा ‘बाई गं’ चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज

एल्विश यादवला नेटिझन्सनी घेरलं
एल्विश यादवने लिहिलं, ‘फुकरा व्यक्ती हाहाहाह. भावा मला माहिती नव्हतं की, तुमचं ह्यूमर आणि टॉलरेन्स, तुम्हाला पाहणाऱ्या जनतेचे…’ यासोबतचं त्याने जोकर इमोजी शेअर केली आहे. त्यानंतर अभिषेकच्या फॅन्सनी एल्विशला खूप ऐकवलं. एका युजरने तर हे म्हटलं की, एल्विशला … सवय झाली आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, एल्विश यादव मल्हन भावांकडून ऑब्सेस्ड झाले आहे.