माजी ISRO प्रमुखांची समिती सूचवणार ‘परीक्षा’ प्रक्रियेत सुधारणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात देशभरातील रोष पाहायला मिळत आहे. यापाठोपाठ नेट परीक्षाही रद्द करण्‍याची नामुष्‍की सरकारवर ओढवली. यानंतर आता शिक्षण मंत्रालयाने देशातील स्‍पर्धात्‍मक परीक्षेतील सुधारणा करण्‍यासाठी एका समितीची स्‍थापना केली आहे. या समितीच्‍या प्रमुखपदी माजी इस्‍त्रो प्रमुख डॉ. के. राधाकृष्‍णन असतील, अशी घोषणा शिक्षण मंत्रालयाने केली आहे. केंद्र …
माजी ISRO प्रमुखांची समिती सूचवणार ‘परीक्षा’ प्रक्रियेत सुधारणा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट-यूजी परीक्षेतील गैरप्रकाराविरोधात देशभरातील रोष पाहायला मिळत आहे. यापाठोपाठ नेट परीक्षाही रद्द करण्‍याची नामुष्‍की सरकारवर ओढवली. यानंतर आता शिक्षण मंत्रालयाने देशातील स्‍पर्धात्‍मक परीक्षेतील सुधारणा करण्‍यासाठी एका समितीची स्‍थापना केली आहे. या समितीच्‍या प्रमुखपदी माजी इस्‍त्रो प्रमुख डॉ. के. राधाकृष्‍णन असतील, अशी घोषणा शिक्षण मंत्रालयाने केली आहे.
केंद्र सरकारने म्हटले आहे की. परीक्षा प्रकिया सुधारणा संदर्भात स्‍थापन केलेली समिती दोन महिन्‍यांमध्‍ये आपला अहवाल सादर करणार आहे. स्‍पर्धात्‍मक प्रवेश परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी ISRO चे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती परीक्षा प्रक्रियेची यंत्रणा सुधारणे, डेटा सुरक्षा प्रोटोकॉल सुधारणे आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ची रचना आणि कार्यप्रणाली सुधारण्या संदर्भातील शिफारशी करणार आहे.
समितीमधील सदस्य
परीक्षा प्रक्रिया सुधारणा समितीच्‍या अध्‍यक्षपदी इस्रोचे माजी अध्यक्ष आणि आयआयटी कानपूरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन असतील. इतर सदस्यांमध्ये डॉ. रणदीप गुलेरिया, एम्स दिल्लीचे माजी संचालक प्रा. बी जे राव, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. राममूर्ती के, आयआयटी मद्रासच्या सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील प्रोफेसर एमेरिटस ; पंकज बन्सल, पीपल स्ट्राँगचे सह-संस्थापक आणि कर्मयोगी भारतचे बोर्ड सदस्य प्रा. आदित्य मित्तल, आयआयटी दिल्लीचे विद्यार्थी अधिष्‍ठाते गोविंद जयस्वाल, शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

Former ISRO chief K Radhakrishnan to head seven-member panel on reforms in examination process: Education ministry
— Press Trust of India (@PTI_News) June 22, 2024

Education Minister Dharmendra Pradhan tweets “Transparent, tamper-free and zero-error examinations is a commitment. Setting up of the high-level committee of experts is the first of a series of step to improve efficiency of the examination process, put an end to all possible… https://t.co/OsdPKrnvCP pic.twitter.com/pPURTo4ebd
— ANI (@ANI) June 22, 2024